मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥१॥
(१.१.). मन, बुद्धी, अहंकार (गर्व), आणि चित्त (स्मरण, अंतर्मन, स्मृती, ग्रहण, जाणीव, चेतना, भान) या शारीरिक-बुद्धीला आकलन होणारे जाणीवां पैकी मी नाही.
(१.२.). कान (ऐकण्यासाठी), जीभ (स्वाद घेण्यासाठी), नाक (वास घेण्यासाठी), डोळे (पाहण्यासाठी) किंवा त्वचा (स्पर्श जानण्यासाठी) या संवेदनाशील पंच-ज्ञानेंद्रियां पैकी मी नाही .
(१.३.). इंद्रियांची निर्मिती आणि कार्य करणारे आकाश, पृथ्वी, जल (पाणी), अग्नी, वायु या पंच-महाभूतां पैकी कोणतेहि भौतिक तत्व मी नाही.
(१,४.). (आनंदी. तृप्त, शुद्ध, मंगल, परम अशा) चिदानन्दाचे सत्य स्वरूप आहे, मी असा तो शिव आहे. मी शिव आहे..
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः
न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः ।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥
(२.१.). प्राण म्हणजे जीवनावश्यक मुख्य चालनादायी शक्ति. आणि तसेच प्राण-वायु पासून निर्मित होणारे प्राण, अपान, समान, उधान आणि व्यान या सर्व एकंदर पांच वायूंच्या संग्रहाला पंच-वायु म्हणतात. शरीरातील प्राण आणि पंच-वायुं पैकी मी नाही.
(२.२.). रस, रक्त, मांस, मज्जा, अस्थी, मेद आणि शुक्र या सप्त-धातूं पैकी आणि तसेच अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पंच-कोषां (आवरण) पैकी कशानेही माझे शरिर बनलेले नाही.
(२.३.). तोंड (मुख, वदन), हात (कर, पाणी, हस्त), पाय (पाद), मलमार्ग, आणि लिंग (उपस्थ) ही पांच क्रियाशील कर्मेंद्रिय या पैकी मी नाही
(२,४.). (आनंदी. तृप्त, शुद्ध, मंगल, परम अशा) चिदानन्दाचे सत्य स्वरूप आहे, मी असा तो शिव आहे. मी शिव आहे.
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥
(३,१.). द्वेष (नावड), राग (क्रोध), लोभ (हाव,लालच) आणि मोह (आवड, संलग्नता) या क्लेशदायी दुर्गुणांपासून मी मुक्त आहे.
(३.२.). मद (अहंकार, अभिमान, घमेंड, गर्विष्ठपणा, मगरुरी) आणि मत्सर (हेवा) या क्लेशदायी दुर्गुणांच्या भावनेपासून मी मुक्त आहे.
(३.३.). आदर्श जीवन जगण्यासाठी नियोजित केलेल्या चार ध्येयांच्या समुहाला चार- पुरुषार्थ असे संबोधतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चार-पुरुषार्थ यांच्या कार्यांपासून मी दूर आहे.
(३,४.). (आनंदी. तृप्त, शुद्ध, मंगल, परम अशा) चिदानन्दाचे सत्य स्वरूप आहे, मी असा तो शिव आहे. मी शिव आहे.
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥४॥
(४.१.). दैनिक जीवनात चांगली कर्मापासून लाभलेले पुण्य हे सुख देतात आणि वाईट कर्मापासून मिळणारे पाप हे दु:ख देतात. पुण्य किंवा पाप ठरविणारे सर्व कर्मापासून मी अलिप्त आहे. घडणारे कर्मापासून मिळणारे सुख अथवा दु:ख हे माझ्या साठी समसमान आहेत.
(४.२.). पवित्र मंत्र-जप (किंवा भक्ति-गीत) आणि तीर्थ-यात्रा (मंदिर-दर्शन) तसेच वेद-पठन (धार्मिक ग्रंथ वाचन किंवा पारायण) आणि यज्ञ (पूजा-विधी / त्याग / बळी) यांची मला आवश्यकता किंवा ईच्छा नाही.
(४.३.). मी भोजन (अनुभव / भोग), भोज्य (अनुभव घेणारा / भोगणारा) तसेच भोक्ता (अनुभवी / भोगीत) देखील नाही.
(४.४.). (आनंदी. तृप्त, शुद्ध, मंगल, परम अशा) चिदानन्दाचे सत्य स्वरूप आहे, मी असा तो शिव आहे. मी शिव आहे.
न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥५॥
(५,१.). मला मृत्युची भिती वाटत नाही (कारण मला मृत्यु नाही), माझी कोणतीही जात नाही (जन्मानुसार माझ्यात काहीहि जातीय भेदभाव नाही कारण माझ्या सत्यरूपी स्व-तत्वा पासून मी भिन्न नाही.)
(५.२.). मला पिता (वडील) तसेच माता (आई) नाहीत. त्यामुळे मला जन्महि नाही (मी अजन्मा आहे, कारण मी कधी जन्म घेतलाच नाही).
(५.३.). मला माझे आप्तगोत संबधित जसे बंधु वगैरे नातेवाईक नाहीत आणि जवळीक असलेले मित्र हि नाहीत, तसेच मला माझे गुरु (आध्यात्मिक शिक्षक / मार्गदर्शक) नाहीत आणि शिष्य (विद्यार्थी) हि नाहीत.
(५,४.). (आनंदी. तृप्त, शुद्ध, मंगल, परम अशा) चिदानन्दाचे सत्य स्वरूप आहे, मी असा तो शिव आहे. मी शिव आहे.
अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् ।
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥६॥
(६,१.). मी निर्विकल्प स्थिती (निर्विचार, नि:संशय दृढ स्थिती) मध्ये आध्यात्मिक क्रियांची सांगता (शेवट) होऊन परमेश्वराशी एकरूप झालो आहे, त्या स्थितीत द्वैतभाव मिटल्यामुळे मी संकल्प आणि विकल्प ह्यांपासून दूर आहे. संकल्प आणि विकल्प ही दोन्ही मनाचा स्वभाव (धारणा) आहेत. संकल्प म्हणजे निश्चय, निर्णय, विचार आणि विकल्प म्हणजे साशंक, संशयी, डगमग, दुग्धा मन:स्थिती. आता या निर्विकल्प स्थितीत माझे अस्तित्व निर्गुण, निराकार झालेले आहे.
(६.२.). मी सर्वव्यापक आहे, मी सर्वत्र आहे. मी प्रत्येकाच्या मुळाचा आधार (पाया) आहे. मी सर्व इंद्रियांमध्ये व्याप्त आहे. मी सर्वत्र असलो तरी मी सर्वत्र समान गुण व रुपात आहे आणि मी कुठेही संबधित किंवा मुक्तहि नाही.
(६.३.). मी कोणापासून मुक्तहि नाही व संबंधितहि नाही. मला कोणतीही ईच्छा नाही कारण मीच सर्वस्व, सर्वत्र, सर्वकाल, व स्थिर आहे, म्हणून मला मुक्ति (मोक्ष) ची ईच्छा नाही. मी पुर्णत: सुखी, आनंदी, संतुष्ट आहे.
(६,४.). (आनंदी. तृप्त, शुद्ध, मंगल, परम अशा) चिदानन्दाचे सत्य स्वरूप आहे, मी असा तो शिव आहे. मी शिव आहे.
मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥१॥
(१.१.). मैं ना तो मन हूँ, ना बुद्धी, ना अहंकार (गर्व, घमंड), ना ही मैं चित्त (स्मृती, चेतना) हूँ | अर्थात मैं मन, बुद्धी, अहंकार और स्मृती इन सबकी अनुभूति के परे हूँ |
(१.२.). मैं ना तो श्रोत्र (कर्ण) हूँ, ना ही जिव्हा, मैं ना तो घ्राण (नाक) हूँ, ना ही नेत्र हूँ | श्रोत्र (कर्ण) से सुनना, जिव्हा से स्वाद लेना, घ्राण (नाक) से सूघना, नेत्र से देखना तथा त्वचा से स्पर्श-ज्ञान होना, यह सब पाँचों भी संवेदनाशील पंच-ज्ञानेंद्रियां में से मैं नहीं हूँ |
(१.३.). इन्द्रियों की निर्मिती तथा कार्य करने वाले, ना तो मैं आकाश हूँ, ना पृथ्वी, ना जल, ना अग्नी, ना ही वायु हूँ | इस पंच-महाभूतों में से कोई भी भौतिक तत्व मैं नहीं हूँ |.
(१,४.). बस मैं तो कभी भी क्षय न होने वाला मंगलमय आनंद हूँ | मैं तो केवल चिदानन्दरूप शिव हूँ, मैं शिव हूँ |
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः
न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः ।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥
(२.१.). जिसे प्राण के नाम से जाना जाता है, वह जीवन हेतु आवश्यक मुख्य चलानेवाली क्रिया-शक्ति मैं नहीं हूँ | वैसे ही प्राण-वायु से निर्मित ना ही मैं प्राण, अपान, समान, उधान और व्यान इन सब पांच वायु संज्ञक पञ्च-प्राण हूँ |.इस तरह शरीर में रहनेवाले प्राण और पंच-वायुं में से मैं नहीं हूँ |
(२.२.). शरीर में सात धातुएं होती है | हर धातु का एक विशिष्ट कार्य होता है | इन सप्त-धातूं में से ना ही मैं रस (यह खाना खाने से निर्मित है), रक्त, मांस, मज्जा (बोनमेरो), अस्थी, मेद (चर्बी) और शुक्र हूँ | और वैसे ही, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय और आनंदमय इन पंच-कोशों (आवरण) में से मैं कोई भी नहीं हूँ | इन में से किसी भी कोशों से मेरा शरिर बना हुआ नहीं है |
(२.३.). मैं ना तो वाणी (मुख) हूँ, ना हाथ (हस्त) हूँ, ना पैर (पाँव), ना गुह्य (मलमार्ग), तथा ना उपस्थ (लिंग) हूँ | इस पांच क्रियाशील कर्मेंद्रिय में से मैं नहीं हूँ |
(२,४.). बस मैं तो कभी भी क्षय न होने वाला मंगलमय आनंद हूँ | मैं तो केवल चिदानन्दरूप शिव हूँ, मैं शिव हूँ |
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥
(३,१.). मैं ना तो विव्देष हूँ, ना ही अनुराग हूँ, ना ही लोभ (लालच), ना मोह (आकर्षण) हूँ |
(३.२.). मैं ना ही घमंड हूँ, ना ही मैं ईर्ष्या जैसी क्लेशदायी भावनाएं हूँ | इन सब दुर्गुणोँसे मैं मुक्त हूँ |
(३.३.). आदर्श जीवन जीने के लिये नियोजन किये हुए धर्म, अर्थ, काम और मोक्ष इन चार तत्वों को चार-पुरुषार्थ कहते है | मैं इन धर्म, अर्थ, काम और मोक्ष पुरुषार्थों के कार्यों से भी परे हूँ |
(३,४.). बस मैं तो कभी भी क्षय न होने वाला मंगलमय आनंद हूँ | मैं तो केवल चिदानन्दरूप शिव हूँ, मैं शिव हूँ |
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥४॥
(४.१.). दैनिक जीवनक्रम में, अच्छे कर्म से मिलने वाले पुण्य से सुख मिलता है और बुरे कर्म से मिलने वाले पाप से दु:ख मिलता है | अच्छा या बुरा कर्म, पुण्य या पाप, सुख या दु:ख भी मैं नहीं हूँ, क्योकिं मैं सब कर्म से परे हूँ, सब सुख या दु:ख मेरे लिए समान हैं |
(४.२.). ना ही मैं मंत्र (या भक्ति-गीत), ना तीर्थ-क्षेत्र (या मंदिर) हूँ, वैसे ही ना ही मैं वेद (धार्मिक ग्रंथ) और ना यज्ञ (पूजा) हूँ | मंत्र-जप, तीर्थ-क्षेत्र-दर्शन, वेद-पठन या यज्ञ-पूजा इन में से किसकी भी मुझे जरुरत या ईच्छा नहीं है |
(४.३.). ना ही मैं भोजन (अनुभव या भोग), ना भोज्य (अनुभव या भोग भोगनेवाला), ना ही भोक्ता (अनुभवी) हूँ |
(४.४.). बस मैं तो कभी भी क्षय न होने वाला मंगलमय आनंद हूँ | मैं तो केवल चिदानन्दरूप शिव हूँ, मैं शिव हूँ |
न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥५॥
(५,१.). मैं ना तो मृत्यु हूँ, मुझे मृत्यु न ही होने के कारण मुझे मृत्यु का डर लगता नहीं | इसीलिए जिंदगी बाबत मुझे कोई शंका या भय नहीं है| मैं किसी भी जाती का नहीं हूँ, जन्म अनुसार मैं ना ही विविध जातियों के भेद में हूँ, क्योंकि मैं मेरे सत्यरूपी स्वतत्वों से भिन्न नहीं हूँ |
(५.२.). मैं ना किसी का पिता हूँ, ना किसी की माता हूँ, ना मुझे पिता हैं, ना माता हैं, इसी लिए मैं ना जन्म देता हूँ, ना ही जन्म लेता हूँ | मैं अजन्मा हूँ क्यों की मैं कभी जन्म लिया ही नहीं है |
(५.३.).मैं ना किसी का आत्मीय हूँ, जैसे की बंधू, पुत्र, पिता नहीं है, ना ही मुझे नजदिक का कोई मित्र है, उसी प्रकार, ना मुझे गुरु (आध्यात्मिक मार्गदर्शक) है, ना मुझे कोई शिष्य (विद्यार्थी) है |
(५,४.). बस मैं तो कभी भी क्षय न होने वाला मंगलमय आनंद हूँ | मैं तो केवल चिदानन्दरूप शिव हूँ, मैं शिव हूँ |
अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् ।
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥६॥
(६,१.).मेरे सभी आध्यात्मिक कार्य सम्पूर्ण होके मैं परमेश्वर से एकरूप हुवा हूँ, इसी लिए मैं निर्विकल्प स्थिती में आया हूँ, इस स्थिती में मैं संकल्प (निश्चय) और विकल्प (साशंक) ये मन की सम्भावनाओं से परे हूँ, और इस निर्विकल्प स्थिती में मेरा अस्तित्व निराकार (आकार रहित) हुवा हैं |
(६.२.). मैं ही सर्वत्र सर्व-रूपों में सजा हुवा हूँ, मैं ही सर्वव्यापक हूँ, और भी मैं सर्वत्र समान गुण व रुप में हूँ और मैं कही भी किसीसे भी संबधित या मुक्त नहीं हूँ, मैं ही सब का मूलभूत आधार हूँ | मैं सभी इन्द्रियों में व्याप्त हूँ, इसी लिए मैं सभी इन्द्रियोंका इन्द्रिय हूँ |
(६.३.). मैं असंगति से, मुक्ति से, तथा ईशत्व से परे हूँ, क्यों की मैं ही सर्वस्व, सर्वत्र, सर्वकाल हूँ और स्थिर हूँ, तथा मैं पुर्णत: सुखी, आनंदी, और संतुष्ट हूँ, इसी लिए मुझे मुक्ति की ईच्छा नहीं है |
(६,४.).बस मैं तो कभी भी क्षय न होने वाला मंगलमय आनंद हूँ | मैं तो केवल चिदानन्दरूप शिव हूँ, मैं शिव हूँ |
आध्यात्मिक शास्त्रानुसार जीवित शरीर हे खालील सहा देहांचे बनलेले आहे.
पंच-महाभूत
संपूर्ण विश्वाला निर्माण करणारे खालील प्रमाणे पाच भौतिक तत्व आहेत ही
१. आकाश, अंतरिक्ष, व्योम Ether,
२. पृथ्वी, भूमी Earth,
३. पाणी, जल, आपस Water,
४. अग्नी, तेजस Fire, आणि
५. वायु, पवन, Air, Wind असे आहेत,
यांना पंच-महाभूत म्हणतात. या पंच-महाभूतां पासून आपली इंद्रियांची निर्मिती आणि कार्य होत असतात.
पंच-महाभूतांचे शरीरातील स्थान, कार्य व गुणधर्म खालील प्रमाणे असतात.
|
आपले शरीर हे खालील सतरा १७ घटकांचे बनलेले आहे, यात ५ ज्ञानेंद्रिय, ५ कर्मेंद्रिय, ५ प्राण (वायु), १ बुद्धी आणि १ मन असे घटक असतात.
सप्त-धातू
रस, रक्त, मांस, मज्जा, अस्थी, मेद आणि शुक्र ही शरीरातील सप्त-धातू आहेत.
धातू म्हणजे घटक, मूलद्रव्य, थर, किंवा लेप. आपले शरीर हे सात मूलभुत घटकांचे बनलेले आहे. ही मूलभुत घटक किंवा तत्व आपली शारीरिक रचना-बांधणी तसेच शारीरिक क्रिया यांच्यासाठी मदत करतात. ही सात मूलभुत घटक खालील प्रमाणे आहेत.
चाईल :- खाल्लेल्या अन्नातील फॅटचे पचन होतांना हे चाईल दुधाळ द्रव रुपात छोट्या इनटेस्टाईन मधे बनत असून त्यात लिंफ आणि इमल्सिफाईड फॅट असतात. चाईल हे शरीरातील सर्व सेल्सचे पोषण करते व नंतर हे चाईलचे रक्तामधे रुपांतर होते.
लिंफ :- हे पतल्या रूपात किंचित गोठलेले द्रव असून यात व्हाईट ब्लड सेल्स (लिंफोसाईट्स) आणि चाईल असते. हे लिंफ नंतर लिंफ्याटिक वेस्सल्स द्वारे रक्तात मिसळते
प्लाजमा :- हे रक्त व लिंफ मध्यें असलेले रंगहिन द्रव असून, या प्लाजमामधे सेल्स नसतात, परंतु यांत रक्त-सेल्स (इरीथ्रोसाईट्स, ल्युकोसाईट्स व त्रंबोसाईट्स) हे न मिसळणारे सॉलिड सेल्स दुबलेले असतात.
रक्त हे लाल रंगाचे द्रव असून रक्तामधील मुख्य घटक प्लाजमा, ब्लड सेल्स (इरीथ्रोसाईट्स, ल्युकोसाईट्स व त्रंबोसाईट्स) व प्लेटलेट्स आहेत. निरनिराळ्या प्रकारचे ब्लड-सेल्स यांना त्यांची विशेष कार्य आहेत. हृदयाच्या पंपिंग-क्रिये मुळे रक्त हे रक्त-वाहिन्याद्वारे पूर्ण शरीरांत वाहत असते आणि शरीराच्या सेल्स व टिश्यू यांचे रक्षण व पोषण करतात. रक्त हें ओक्सीजन-कार्बनडायओकसाईड ही वायु, आणि ग्लुकोज यांच्या अदलाबदलीचे कार्य करते.
मांस किंवा मसल-टिश्यू हे शारीरिक ताकद देतात. शरीरांत पुष्कळ प्रकारांची मसल-टिश्यू आहेत, जसे (१) हृद्य कंदर (कारडियाक मसल) , (२) वर्तुळ कंदर (स्मूथ मसल , (३) अस्थी कंदर (स्केलेटल मसल). हें मसल्स शरीरातील अस्थी-सांगाडयाशी जोडलेले असतात. हें मसल्स अस्थी-जॉइंट्सच्या हालचाली साठी मदत करतात. ही हालचाल आपल्या दररोजचे कार्य जसे चालणे, पळणे, खेळणे, बसणे, वाकणे वगैरे साठी आवश्यक असते. याप्रमाणे मांस किंवा मसल-टिश्यूचे मुख्य कार्य हे मेधा धातू (मेद) साठी शारीरिक ताकद व आधार पुरविणे हे आहे.
मज्जा धातू हा शरीरात मगज (मॅरो) रुपात असुन तो अस्थी धातूला आधार देण्याचे कार्य करतो. मज्जा धातूपासून पिवळा (येल्लो) आणि लाल (रेड) बोन-मॅरो टिश्यू निर्माण होतात. बोन-मॅरो हे अस्थीच्या आंतील पोकळ भागांत भरलेले असते व शरीराला मलमासारखे मुलायम करते. बोन मॅरो हे रक्त निर्माण करते.
-- अन्न सेवणा नंतर निर्माण होणारा -- आहार रस
-- आहार रसा पासून निर्माण होणारा -- रस धातू (प्लास्मा)
-- रस धातू पासून निर्माण होणारा – रक्त धातू (ब्लड सेल्स)
-- रक्त धातू पासून निर्माण होणारा -- मांस धातू (मसल टिश्यूस)
-- मांस धातू पासून निर्माण होणारा -- मेधा धातू (फॅटी टिश्यूस)
-- मेधा धातू पासून निर्माण होणारा -- अस्थी धातू (बोन्स)
-- अस्थी धातू पासून निर्माण होणारा -- मज्जा धातू (बोन मॅरो आणि नर्वस टिश्यूस), आणि शेवटी
-- मज्जा धातू पासून निर्माण होणारा -- शुक्र धातू (रिप्रोडक्टिव टिश्यूस)
पंच-कोष
शरीर ही तीन भागांची असून त्यात पाच कोश राहतात. शरीराचे ही तीन भाग खालील प्रमाणे आहेत :- (१) स्थूल शरीर Gross Body, (२) लिंग शरीर Subtle Body or Astral Body - हे डोक्यात असून त्यात मन व बुद्धी असते, आणि (३) कारण शरीर Causal body - हे हृदयात असून त्यात अहंकार व चित्त असते. शरीरा सभोवती अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय ही पंच-कोष (आवरण) असतात.
ह्या पांच कोशांपैकी अन्नमय कोश हा स्थूल देह (physical body) आहे, प्राणमय, मनोमय व विज्ञानमय ही तीन कोश हे लिंग शरीर (Subtle Body or Astral Body) आहेत, आणि आनंदमय कोश हा कारण देह (causal body) हे आहेत.
|
स्थूल देह हा अस्थी-सांगाडा (skeletal framework), स्नायू (muscles), पेशी (tissues), अवयव (organs), रक्त (blood), आणि पांच संवेदनाशील इंद्रिय (sense organs), वगैरे यांही रचलेला आहे.
मेंदूशी जोडलेल्या मज्जातंतु (nerves) पृष्टकण्या (spinal cord) द्वारे शरीरातील अंतर्गत (internal) अवयवांना सतत विद्युत शक्ति पुरविते आणि सर्व अवयवांना चेतनामय प्राणशक्ति देऊन आपल्या शरीराला जिवंत ठेवते. हे मज्जातंतु आपल्या शरीरातील पांच संवेदनशील (ज्ञानेंद्रिय) आणि पांच क्रियाशील (कर्मेंद्रिय) इंद्रियांशी जोडलेले असल्यामुळे आपले शरिर कार्यकारी बनते. मज्जातंतु व त्यावर असणारे मानसिक केंद्र हे शरीरातील सर्व कार्यांना नियंत्रित करतात.
संवेदनाशील पंच-ज्ञानेंद्रिय पुढील प्रकारचे आहेत. –
कान, जीभ, नाक, डोळे व त्वचा
ऐकण्यासाठी श्रवनेंद्रीय शोत्रेंद्रिय - कान
चव किंवा स्वाद घेण्यासाठी रसनेंद्रीय - जीभ (जीव्हा)
वास किंवा गंध घेण्यासाठी घ्रानेंद्रीय - नाक
दृष्य पाहण्यासाठी चक्षुईंद्रिय - डोळे
स्पर्श जानण्यासाठी - त्वचा (चामडी)
क्रियाशील पंच कर्मेंद्रिय पुढील प्रकारचे आहेत. –
मुख, पाय, हात, मलमार्ग व लिंग
बोलण्यासाठी - तोंड (मुख, वदन)
चालण्यासाठी (चलन किंवा स्थलांतर) - पाय (पाद)
हस्तकामासाठी - हात (कर, पाणी, हस्त)
अन्नमल (विष्ठा) बाहेर टाकण्यासाठी (उत्सर्जन) - मलमार्ग
मैथुन अथवा प्रजनन (प्रजोत्पादन) साठी- बाह्य-ईंद्रिय (उपस्थ, लिंग)
प्राण म्हणजे प्राण देह हे स्थूल देह व मनो देह या दोन्ही देहांच्या क्रिया-कार्यासाठी लागणारी जीवनावश्यक जीवन-पोषक मुख्य चालनादायी शक्ति आहे. प्राण-वायु पासून निर्मित होणारे प्राण, अपान, समान, उधान आणि व्यान या सर्व एकंदर पांच वायूंच्या संग्रहाला पंच-वायु म्हणतात. ही जीवनावश्यक शक्ति म्हणजेच प्राण खालील पांच प्रकारांची आहेत –
मनो देह ही आपल्या मनात येणारे भाव, भावना किंवा संवेदना (feelings), भाव-विकार (emotions), आणि व कामना, ईच्छा किंवा आशा (desires) यांच्या निर्मांण कार्यासाठी मनातील आसन (जागा) आहे, मनो देह हा शरीरातील मेंदू (brain) या अवयवा द्वारे कार्य करतो. गत जीवनातील अगणित चांगले किंवा वाईट अनुभवांचा ठसा, छाप किंवा मुद्रा (impressions) प्रवाहित होवून मनावर बसतो. हा अनुभवांचा ठसा हा खालील तीन प्रकारांपैकी कोणतेही एक प्रकारचे मन (mind) बनवितो. (१). पूर्ण जाणीव जागरूक किंवा सावध असलेले मन (consciousness), (२). अर्धवट जाणीव असलेले मन (sub-consciousness), आणि (३) बेहोष, गाफिल, किंवा पूर्णत: बेसावध असलेले मन (unconsciousness) यातील अर्धवट सावध मन व पूर्णत: बेसावध मन यांच्या एकत्रिकरणाला चित्त म्हणतात. मनाद्वारे आपल्या शरीरामधे मेंदू, श्वासोश्वास, मज्जातंतु, पंच-ज्ञानेंद्रिये आणि पंच-कर्मेंद्रिये ह्या सर्वांची मिळून बनलेली कार्य-प्रणाली ही कार्यान्वित व नियंत्रित होत असते. मन हे जागरुकताचे साधन असून ते संवेदना (जाणीव) द्वारे आपल्या कार्याच्या सफलताचे साक्षात्कार (फलित) दाखविते. मनाला संवेदने द्वारे मिळणारे संकेत (सूचकता) हे मेंदू द्वारे कार्यान्वित होतात. मन हे अतिशय सक्रिय असून हे स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती यांचे भंडार (कोठार) आहे. मन हे वर्तमान-काळातून भूत-काळात तसेच एका परिस्थितीतून दुसरी परिस्थितीत सहज उडी घेऊ शकते.
कारण देह हे निर्णय किंवा निश्चय करणे (decision making) आणि तर्क करणे किंवा उपाय व कारण शोधणे (reasoning) यांची क्षमता किंवा सामर्थ्य (ability) आहे. कारण देह हा शरीरातील मेंदू (brain) या अवयवा द्वारे कार्य करतो.
महाकारण देह हा वस्तुस्थिती किंवा वास्तविकता (nescience) ची अंतिम सूचना (vestige) बाबत अज्ञानता आणि ईश्वरापासून भिन्न असणारी भावना (नास्तिकता) दर्शवितो,
महाकारण देहाचे खालील चार विभाग आहेत (१) मानस किंवा मन (mind), (२) बुद्धी (intellect), (३) स्मरण, स्मृती किंवा चित्त (memory) आणि (४) अहंकार किंवा मी-पणा (ego).
हे चारही विभाग शारीरिक-बुद्धीला आकलन होणारे जाणीवां पैकी आहेत.
मन :-
सावध असलेल्या मनामध्ये मानस, बुद्धी, आणि अहंकार हे जागृत स्थितीत असतात.
अंत:करण हे व्यक्तिगत अंतर-मानसिक इंद्रिय असून यांत मानस, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जागृत स्थितीत असणारे विभाग आहेत.
मानस, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही चारहि डोळ्यांना न दिसणारे अदृष्य विभाग असले तरी ते निरपवाद (absolute) सत्य ज्ञानाच्या सहाय्याने समजतात (जाणवितात), हे विभाग पूर्णत: स्थुल रुपांमधे आहेत. शुद्ध स्वरुपात असलेला आत्मा हा कोणत्याही प्रकारे अंत:करणाशी संबधित नाही. अंत:करण आणि आत्मा अलग-अलग भिन्न आहेत.
संकल्प आणि विकल्प हे दोन्ही मनाचा स्वभाव (धारणा) आहेत. संकल्प म्हणजे पक्का / ठाम निश्चय, निर्णय, विचार आणि विकल्प म्हणजे साशंक, संशय, डगमग, अनिर्णीत, संदिग्ध, अस्थिर , दुग्धा मन:स्थिती. परंतु निर्विकल्प स्थितीत आपले अस्तित्व निराकार आणि निर्गुण झालेले असते. संकल्प आणि विकल्प हे मनाचा धरसोडपणा, अनिश्चितपणा दर्शवितात. आपले मन डळमळते कारण मनाला ज्ञानेंद्रियांद्वारे जगातील बाह्य साधन-सामुग्री यांची माहिती समजून ज्ञात करून जमा करायची
असते, मन हे त्याच्या 'सावध, अर्धवट-सावध व पूर्णत:-बेसावध' अशा तीन गुणांमुळे कोणत्याही वस्तू, विचार, कार्य किंवा घटना ह्यांच्या आवड किंवा नावड बाबत निर्णय घेऊ शकते. आणि मन हेच अंत:करण (अंतर-ज्ञानेंद्रिये) आणि बाह्यकरण (बाह्य-ज्ञानेंद्रिये) या दोघांनाही जोडणारे महत्वाचे घटक (अवयव) आहे, अशावेळी निर्णय घेतांना मन सहाजिकच गोंधळेल आणि ‘हे कीं ते’ या भावनेमुळे संकल्प-विकल्प मनात निर्माण होतील.
बुद्धी :-
एखाद्दया विषयाबद्दल खात्रीपूर्वक निर्णियात्मक निश्चिती किंवा शाश्वती ठरविणे हा बुद्धीचा मुलभूत स्वभाव आहे. मनाची अनिश्चिता किंवा अनिर्णयता याची धारणा आता पुढील मार्गदर्शना करिता बुद्धीची मदत घेते. अशा वेळी बुद्धी ही गुरु तर मन हे शिष्य असते.
या वेळी बुद्धी ही सर्वात उत्तम व पोषक असे निर्णय घेण्यासाठी मनाला मार्गदर्शन करते. जरी बुद्धी ही मनाचे सुधारित उत्पादन असले तरी, बुद्धी ही मनापेक्षा श्रेष्ट होत नसते.
स्मृती किंवा चित्त :-
वाईट अथवा चांगले अनुभवानुसार जी सावधानता किंवा जागरुकता मनामधे येते, ती जागरुकता निर्माण करण्याची क्षमता म्हणजे चित्त होय. पुर्ण सावधगिरी ही अर्धवट-सावधगिरीच्या अनुभवाच्या परिणामावर अवलंबून असते. अर्धवट-सावध मनाच्या वाईट अनुभवामुळे नंतरहि वाईट परिणाम निर्मित होतील, परंतु चांगल्या अनुभवामुळे नंतरहि चांगले परिणाम निर्मित होतील. सावधगिरी निर्माण करणारे चित्त आणि सावधगिरी घेणारे मन हें दोन्हीं अलग-अलग आहेत, परंतु ते दोघेही एकमेकावर अवलंबून आहेत. सावधगिरी ही फक्त मनापुरती मर्यादित नसून पुर्ण शरीराला सावधगिरीची आवश्यकता असते. आध्यात्मिक यात्रेच्या शेवटी अशी जाणीव येते की योगी-पुरुष हा एखाद्याचे शरीर नसून तो एक सावध असलेला जागृत परम आत्मा आहे. सामान्य माणसाची सावधगिरी बाह्य जगातील वस्तूंशी निगडित असते, त्यामुळे तो बाह्य जगावर विजय मिळवू शकतो, परंतु योगी-पुरुषाची सावधगिरी बाह्य-जग दुर्लक्षित करून अंतर-दृष्टीने अंतर-अनुभवाशी संबधित असतो, त्यामुळे योगी-पुरुष आंतरिक विश्वावर विजय मिळवितो. योगी-पुरुषामधे त्याच्या तीव्र आध्यात्मिक बुद्धी मुळे आणि उच्च नैतिक (सोज्वळ) जीवन-राहणी मुळे त्याच्या सावधगिरीचे शुद्धीकरण होते. सामान्य माणूस आध्यात्मिक बुद्धी आणि नैतिक जीवनामुळे योगी बनू शकतो, आणि अंतरविश्वातील परमात्माशी संबंध साधून त्याच्यशी एकरूप शकतो.
अहंकार :
अहंकार म्हणजे माया. मायेमुळे असा भ्रम होतो की सभोवतील सामान्य व्यक्तींपेक्षा मी म्हणजे काहीतरी विशेष ज्ञान असल्यामुळे अलग अस्तित्व जानविणारी असामान्य व्यक्ती आहे. कर्ता-करविता तो मीच असा विचार म्हणजे अहंकार. मी म्हणजे माझे शरीर, व शरिराच्या कार्यांसाठी मीच जबाबदार (कारण) आहे, उदाहरणार्थ जेव्हा शरीर बोलते चालते, तेव्हां तेव्हां अहंकारी व्यक्ती म्हणतो कीं मी बोलतो, मी चालतो. परंतु अहंकारी व्यक्तीला मृत्युची खूपच भिती वाटते. जेव्हा शारिरिक समस्या उदभवते, तेव्हा अहंकारी व्यक्ती ही जास्ती सावध (जागरूक) होतो आणि अहंकार शरीरात जास्त मजबूत (बलवान) होतो. जिथे जिथे अस्तित्वाला धोका असतो, तिथे तिथे अहंकार जास्त बलवान बनतो. प्रत्येकाच्या अस्तित्वासाठी अहंकार ही जीवनावश्यक घटक आहे. अहंकार म्हणजे नुसता स्वाभिमान नाही. सर्वांपेक्षा श्रेष्ट (सर्वोत्तम) होण्यासाठी प्रत्येकांनी अहंकराला समजावून घेणे आवश्यक आहे. अहंकाराचा गुणधर्म तसा मनासारखाच असतो, परंतु अहंकाराला काबूत ठेवणे अतिशय कठीण असते.
सध्याचे युग हा स्पर्धात्मक काळ आहे, कोण पहिला येईल? , कोण सर्वोत्तम आहे? , असाच विचार प्रत्येकाच्या मनांत उद्भवतो , अशा वेळी अहंकार म्हणत असते की मीच पहिल्या क्रमांकाचा , मीच सर्वोत्तम आहे व राहील. याच चढाओढीमध्ये आपला अहंकारच तसे सर्वोत्तम बनण्यासाठी शरीरांत शक्ती (ताकद) निर्माण करतो. शक्ती प्रदान करणारी अहंकाराच्या या क्रियेला इच्छाशक्ती म्हणतात. थोडक्यात, अहंकारामुळे इच्छाशक्ती प्रबल बनते आणि न करू शकणारे कार्यही आता सफल करू शकतो.
जेव्हा शरीरात अहंकार हा राजा असतो, तेव्हा बुद्धी ही आज्ञा पाळणारा प्रधानमंत्री, आणि मन हे इकडे-तिकडे फिरणारे जनसंपर्क -अधिकारी असतात, अशा प्रमाणे बुद्धी व मन हे दोन्ही अहंकाराचे नौकर बनतात.
आत्मा हा महाकारण देहाचा (subtle body) मुख्य भाग आहे, परंतु आत्मा हा महाकारण देहाच्या विविध भागांच्या पलिकडे अलग राहतो.
महाकारण देह हा परम ईश्वरीय तत्वाचा अंश आहे.
परम ईश्वरीय तत्व हे खालील तीन गुणधर्मांचे आहे (१) सत म्हणजे निरपवाद सत्य (absolute truth) (२) चित म्हणजे निरपवाद जागरूकता (consciousness) आणि (३) आनंद म्हणजे सुख-संतोष (bliss).
आपल्या प्रत्येकांत पंच-कोशाच्या सर्वात आतील कोशाच्या मध्ये एक दैविक तेजोमय जागृति असते. हिला मी, स्वत: म्हणजेच आत्मा म्हणतात. आत्मा हा सदोदित आनंद स्थितीत आणि अंतरज्योती स्वरुपात असतो. हा संपूर्णत: अलिप्त असून आत्मा आपल्या जीवनातील चढ-उतार (घडामोडी) मुळे आणि कोणत्याही सभोवती घडणारी घटना किंवा क्रिया द्वारे विचलित होत नाही.
आत्म्याला आपल्या जीवनाचे नाटक पाहण्यास मजा वाटते, आत्मा आपल्या जीवनातील चढ-उतार (घडामोडी) कडे व आपल्या जीवनाचे नाटकाला फक्त भ्रम अथवा माया (illusion) म्हणजे अहंकाराचे अपूर्ण राहिलेल्या इच्छा समजून पाहतो.
गाढ निद्रेत आणि समाधी-अवस्थेत मन, अहंकार व बुद्धी ह्या निष्क्रिय असतात. गाढ निद्रेत जागरुकता नसते, परंतु समाधी-अवस्थेत जागरुकता असते.
षड्रिपु (Shadripu)
षड्रिपु म्हणजे शारीरिक आत्म्याचे सहा शत्रू वैरी (enemies)
षड्रिपु खालील प्रमाणे आहेत :-- काम, लोभ, क्रोध, मद, मोह, मत्सर
१. काम = Lust , वासना , लालसा
२. लोभ = Greed , हाव, लालसा
३. क्रोध = Anger , राग, संताप, क्रोध, चीड
४. मद = Arrogance, Pride, मग्रुरी, ताठा, माज, घमेंड, उद्धटपणा, अभिमान, स्वाभिमान, गर्व, अहंकार
५. मोह = Attachment , आवड, ओढ, लळा
६. मत्सर = Jealousy, Covetousness, हेवा, भेदभावपणा, जलफळाट
या भौतिक जगांत जन्म आणि मृत्यू ह्यांच्या प्रक्रिये दरम्यान हे षड्रिपु आत्म्यासोबत माया (illusion) स्वरूपात जोडलेले असतात. या षड्रिपु पैकी, काम, लोभ व क्रोध हे पहिले तीन शत्रू मृत्यूनंतर आत्म्याला नरकाच्या रस्त्याकडे ओढतात.
वैदिक शास्त्रानुसार, एकंदर ४, वेद , १८ पुराण आणि १०८ उपनिषद आहेत. . यांत ४ वेदांची सूची या प्रमाणे -
यांत १८ पुराणांचे तीन दैविक शक्ती असलेल्या त्रिमूर्ती-स्वरूपातील – ब्रम्हा, विष्णु (वैश्नव), शिव (शैव) – यांच्या संदर्भानुसार वर्गीकरण खालील प्रमाणे केलेले आहेत. या १८ पुराणांची सूची या प्रमाणे - - -
०१. ब्रह्म पुराण , ०२. ब्रह्मांड पुराण, ०३. ब्रह्मवैवर्त पुराण , ०४. मार्कंडेय पुराण , ०५. भविष्य पुराण
०६. विष्णु पुराण , ०७. भागवत पुराण , ०८. नारदेय, ०९. गरुड पुराण , १०. पद्म पुराण , ११. वराह पुराण , १२. वामन पुराण , १३. कूर्म पुराण , १४. मत्स्य पुराण ,
१५. शिव पुराण , १६. लिंग पुराण , १७. स्कंद पुराण , १८. अग्नि पुराण .
तसेच या १८ पुराणांचे तीन गुण (त्रिगुण) - सत्त्व (सत्यता, शुद्धता, उत्तमता, रचनात्मक, सुंदरता , सुबकता), राजस (उत्कट भावनेचा उद्रेक, कार्यक्षम, खोटा ठरविणारा), तामस (अज्ञानी, दुर्लक्षित. अलगपणा, खोटा ठरविणारा, विध्वंसक, वेल्हाळ) - यांच्या गुणधर्मा नुसार वर्गीकरण खालीलप्रमाणे केलेले आहेत.
०१. विष्णु पुराण , ०२. भागवत पुराण , ०३. नारदेय पुराण , ०४. गरुड पुराण , ०५. पद्म पुराण , ०६. वराह पुराण ,
०७. ब्रह्मांड पुराण, ०८. ब्रह्मवैवर्त पुराण , ०९. मार्कंडेय पुराण , १०. भविष्य पुराण , ११. वामन पुराण , १२. ब्रह्म पुराण ,
१३. मत्स्य पुराण , १४. कूर्म पुराण , १५. लिंग पुराण , १६. शिव पुराण , १७. स्कंद पुराण , १८. अग्नि पुराण
अनेक सूची मिळून एकंदर २० पुराणे असून त्यात ४,२९,००० श्लोक आहेत
मुक्तीकोपनिषद या उपनिषदामध्ये १०८ उपनिषदांची सूची दिलेली आहे.यात ही १०८ उपनिषद विशिष्ट चार वेदांमध्ये खालील प्रमाणे विभागली आहेत.
पातांजली तंत्र योगानुसार, मनुष्य शरीरांत मुख्य योगिक चक्र एकंदर सांत आहेत. जसा योगी त्याच्या योगिक अभ्यासात प्रगती करतो, त्यानुसार त्याच्या शरीरातील योगिक चक्रे कार्यशील होत जातात. हे सात चक्र म्हणजे मानवी शरीरात पसरविणारी चैतन्य शक्तीचे सात जीवन शक्ती-केंद्र आहेत. चक्र म्हणजे प्रकाशाचे रहाट-चक्र (फिरणारे चाक) किंवा शक्तीचे चक्र. ही चक्रे आपल्या लिंग-शरीरात (Astral Body) असून ती डोळ्यांनी दिसत नाहीत. या चक्रांची जाणीव फक्त मनकेंद्रीकरण व ध्यान प्रक्रियेने होऊ शकते. ही महत्वाची सात योगिक शक्ती-चक्रांपैकी मधले पांच चक्र - मूलाधार , स्वाधिष्ठान , मणिपूर , अनाहत आणि विशुद्ध - ही पांचहि चक्रे शरीराच्या मध्यात पाठीचा कण्या (Spinal Cord) सोबत वेगवेगळ्या अनुक्रमे - कोकिजिअल , साक्रम , लंबर , डोर्सल आणि सर्विकल या पांच भागांत मेरुदंडाच्या (vertebral column) आधारे लंब-रेषेत उभे संरेखित आहेत. ही चक्रे शक्तीचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी झडप (valves) प्रमाणे कार्य करतात. उत्तम तब्येती साठी या सातहि चक्रांमध्ये योग्य संतुलन असणे आवश्यक आहे. मनुष्याच्या पाठीचा मणका (पृष्ठकणा) यांत इडा, पिंगला, आणि सुषुम्ना या तीन योगिक नाडी आहेत, या तीन पैकी, सुषुम्ना नाडी ही वरिल योगिक चक्रांशी जोडलेली आहे. नाडी म्हणजे सूक्ष्म शरीरातील नलिका, ज्या द्वारे जीवनावश्यक असलेली प्राण शक्ती वर वर सरकते. चक्र हे जीवनावश्यक शक्तीचे सूक्ष्म केंद्र आहे. हृदयातील अनाहत चक्र हे एकंदर १०८ शक्ती - नाडींच्या एकवटण्याने संयोग होवून बनते. सर्व सातहि चक्र हे त्या योगिक केंद्रामधील शक्ती - नाडींचे सुषुम्ना नाडीशी संयोग होवून बनते. फक्त हीच सूक्ष्म सुषुम्ना नाडी जगण्याला अत्यावश्यक असणारी प्राण शक्ती ही लिंग - शरीराच्या मज्जातंतु रचनाद्वारे सहाही चक्रा मधून वर वर जाउन शेवटी सर्वात वरिल सहस्रार चक्रात शिरते, त्या वेळी आपण स्वतः आत्मा-स्वरूपी असल्याची पूर्तता (अनुभूती, जाणीव) होते.
१). मूलाधार चक्र (Root or Base Chakra in anus) - हे सर्वांत खालील आधार चक्र आहे. मूलाधार चक्र हे ४ लाल रंगाच्या पाकळ्या असलेल्या कमळाने संबोधितात. हे चक्र पाठीच्या माकडहाडाच्या कणाच्या (पृष्ठकणाच्या) खालील जागी असते. या मूलाधार चक्रात कुंडलिनी ही योगिक शक्ती असून ती काळ्या स्वयंभू लिंगा सभोवती सुप्त (निद्रीस्त) अवस्थेत साडे-तीन गुंडाळी मारलेल्या स्वरुपात असते. या मूलाधार चक्रात इडा, पीडा, व सुषुम्ना ह्या तीन मुख्य नाडी अलग-अलग असून त्यांचा ऊर्ध्वगामी (वरच्या बाजूला) सरकण्याचा प्रारंभ इथून होतो. मूलाधार चक्र हे जननग्रंथी (gonads) आणि एड्रीनल मेडूला (adrenal medulla) यांच्याशी संबंधित असून ते जीवन-संकटात संघर्ष (लढाई) किंवा संघर्ष-प्रतिक्रिया घडवितात. मूलाधार चक्राचे मूलमंत्र लं असून त्यात गणेश हा देव आणि डाकिनी ही शक्ती राहतात. मूलाधार चक्र हे अंतःप्रेरणा (सहजभाव), निर्भयता (सुरक्षितता), जिवंतपणा, आणि मानवी मूल संभवनीयता (अव्यक्तता) यांच्याशी संबंधित आहे.मूलाधार चक्राचे लैंगिकता हे शारीरिक कार्य, स्थिरता हे मानासिक कार्य, भोगासक्ती (विषयलोलुप्त) हे भावनात्मक कार्य, सुरक्षितपणाची जाणीव (निर्भयता) हे आध्यात्मिक कार्य आहेत. तसेच मूलाधार चक्राचा वास (गंध) याची जाणीव याबाबत संबंध आहे.
२). स्वाधिष्ठान चक्र (Splenic or Sacral chakra near genital organ) - हे जननेन्द्रिया जवळ आहे. स्वाधिष्ठान चक्र हे पांढऱ्या रंगाची चंद्रकोर आंत असलेल्या ६ शेंदरी किंवा केशरी (नारिंगी) पाकळ्या असलेल्या कमळाने संबोधतात. या स्वाधिष्ठान चक्राचा वं हा मूलमंत्र असून त्यांत ब्रह्मा हा देव आणि राकिनी (चाकिनी) ही शक्ती राहतात. स्वाधिष्ठान चक्र हे सैक्रम या अस्थिमधे आहे {सैक्रम (Sacrum) ही त्रिकोणी पाचर (wedge-shaped) च्या आकाराची अस्थि असून ती पांच मणक्यांना सांधून बनलेली ओटीपोट (pelvis) च्या पाठीमागचा भाग असून तिचा तळभाग हा सर्वात खालच्या कमर-मणक्याशी (lumbar vertebra) जोडलेला असून तिचा कलंडलेला भाग हा माकडहाडा (गुदास्थी) शी (coccyx) जोडलेला असतो }, आणि या चक्राचे कार्य टेसटिज किंवा ओवरिज (testes or ovaries) समान असून पुनरुत्पादन चक्रासंबंधीचे निर्मित होणारे लिंग संप्रेरक (sex hormones) शी संबंधित आहे. स्वाधिष्ठान चक्राचा गुप्तांग (लिंग) व मूत्रमार्ग (genitourinary) पद्धती आणि एड्रीनल (adrenals) शी संबंधित आहे. स्वाधिष्ठान चक्राचे मुख्य कार्य नातेसंबंध, हिंसा, व्यसन, मूलभूत भावनाप्रधान जरुरी, आणि आनंद असे आहे. स्वाधिष्ठान चक्राचे प्रजनन (पुनरुत्पादन) हे शारीरिक कार्य, निर्मितिक्षमता (कल्पकता) हे मानसिक कार्य, हर्ष (आनंद) हे भावनात्मक कार्य आणि उत्साह (हुरूप) हे आध्यात्मिक कार्य अशी आहेत.
३). मणिपूर चक्र (Navel Chakra or Solar Plexus Chakra in navel region ) - हे बेंबी जवळ आहे. मणिपूर चक्र अधोगामी(खालील) दर्शविणारे त्रिकोण हे पिवळ्या रंगाच्या १० पाकळ्या असलेल्या कमळा समान असते. या चक्राचे मूलमंत्र रं असून, भद्र रुद्र हा देव आणि , लाकिनी ही शक्ती त्यांत राहतात. मणिपुर चक्र हे शरीरात घडणाऱ्या अन्नाचे चयापचय (Digestive & Metabolic Functions) शी संबंधित आहे. मणिपुर चक्र हे पेनक्रियाज (Pancreas) च्या Islets of Langerhans या पेशींच्या समुहासमान तसेच बाह्य एड्रीनल ग्लॅंड (adrenal glands) आणि एड्रीनल कोरटेक्स (adrenal cortex) समान कार्य करतात. ही सर्व आपल्या शरीरात अन्नाचे पचन (digestion) आणि अन्न-घटकांचे शरीर-कार्यासाठी लागणाऱ्या शक्तीमध्ये (ATP) रुपांतर करतात. मणिपुर चक्र हे मुख्यतः वैयक्तिक शारीरिक शक्ती, भिती, उत्सुकता, अभिप्राय (मत बांधणी), अंतर्मुखता, आणि साध्या भावनेचे किचकट भावनेत अवस्थांतर ह्या क्रीयांशी निगडीत आहेत. मणिपुर चक्र हे पचन या शारीरिक क्रिया, वैयक्तिक शक्ती ही मानसिक क्रिया, भव्यता ही भावनात्मक क्रिया आणि वृद्धी बाबतचे सर्व विचार हे अध्यामिक कार्य करतात.
४). अनाहत चक्र (Heart Chakra in heart) - हे हृदयात आहे. अनाहत चक्राला हृदय चक्र असेही त्याच्या स्थानानुसार संबोधतात. अनाहत चक्र हे हिरव्या रंगाच्या १२ पाकळ्यांचे वर्तृळाकार कमळ असे संबोधतात. ह्या चक्रात दोन त्रिकोण छेदून बनलेले षटकोनी यंत्र आहे, हे यंत्र पुरुष शक्ती आणि स्त्री शक्ती यांचे मिलन दर्शविते. is या चक्राचा मूलमंत्र यं असून, यातील राहणारे देव ईशान रुद्र शिव, आणि शक्ती काकिनी आहेत. अनाहत चक्राचे कार्य छातीत असलेल्या थायमस (Thymus)शी संबंधित आहे. थायमस हे सुरक्षा पद्धतीचे मूलघटक आणि एन्डोक्राइन (Endocrine) पद्धतीचा एक हिस्सा (भाग) आहे. रोग प्रतिकारक घटक तयार करणाऱ्या टि-सेल्स (T cells)च्या परिपक्वताचे थायमस हे स्थान असून हे ताण-तणाव मुळे विरुद्ध रितीने प्रभावित होऊ शकते. अनाहत चक्राचे कार्य म्हणजे किचकट भावना (मनोविकार), कारुण्य (कळवळा), वात्सल्य (प्रेमळपणा), माया-ममता (बिनशर्त प्रेम), स्थिरता (समतोलपणा), नकार (नापसंती) आणि कल्याण ( सुख, हितकारी) ही आहेत. अनाहत चक्राचे अभिसरण (प्रसार) हे शारीरिक कार्य , स्वतः बद्दल व इतरांबद्दल माया-ममता हे भावनिक कार्य, तीव्र भावना (आवेग) हे मानसिक कार्य, आणि निष्ठा (भक्ती) हे आध्यात्मिक कार्य असे आहेत.
५). विशुद्ध चक्र (Throat Chakra at root of neck) - हे कंठ (गळा, घसा) मध्ये आहे. विशुद्ध चक्राला कंठ चक्र असेही त्याच्या स्थानानुसार संबोधतात. हे पांढऱ्या वर्तुळात रुपेरी चंद्रकोर असून तिच्या भोवती फिक्कट निळा रंगाच्या १६ पाकळ्या असे चित्रित करतात. ह्या चक्राचा मूलमंत्र हं असून त्यात पंचवक्त्र शिव आणि शाकिनी हि शक्ती राहतात. विशुद्ध चक्र हे संदेश (संपर्क) आणि प्रकटीकरण द्वारे विस्तार शी संबधित आहे. ह्या विशुद्ध चक्राची क्रिया हि कंठातील थायराइड हारमोन स्त्रवणाऱ्या थायराइड ग्लॅंड (Thyroid gland) समान आहे. थायराइड ग्लॅंड ही शारीरिक वृद्धी आणि परिपक्वता (पूर्णावस्था)चे कार्य करते. त्याच प्रमाणे संदेश (दळणवळण, संपर्क) असे शारीरिक कार्य, स्वातंत्र्य हे भावनात्मक कार्य, अस्खलित विचार हे मानसिक कार्य, आणि सुरक्षितता बाबत जाणीव असे आध्यात्मिक कार्य करते.
६). आज्ञा चक्र (Third Eye or Agya Chakra or Brow Chakra between two eyebrows)- आज्ञा चक्राला तीसरा नेत्र (डोळा) चक्र म्हणतात. हे दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे. हे चक्र जांभळा किंवा निळा रंगाचे दोन पाकळ्यांचे कमळ रुपात असते. ह्या ठिकाणी आजूबाजूच्या दोन इड़ा आणि पिंगळा नाड्या संपून त्या दोन्ही मध्य नाड़ी सुषुम्ना मधे मिसळून जातात. त्यामुळे द्वैतपणा म्हणजे दोन प्रकारचे विचार (जसे हा आणि तो, पुरुष आणि स्त्री, चांगले आणि वाईट, पाप आणि पुण्य, उजेड आणि अंधार) हे संपतात. ह्या चक्राचे मूलमंत्र (मूळ अक्षर) ओम आहे. ओम म्हणजे आत्मा. म्हणून आपल्या शरीरातील आत्म्याचे स्थान त्रिपुटीत आज्ञा चक्रावर आहे. या आज्ञा चक्रामध्ये अर्धनारीश्वर देव आणि हाकिनी शक्ती राहतात. आज्ञा चक्राचे कार्य हे साधारणपणे पिनियल ग्लॅंड (Pineal gland) शी सम्बंधित आहे. पिनियल ग्लॅंड ही एंडोक्राइन ग्लॅंड असून ती एपिथ्यालामस मधे (Epithalamus), मेंदूच्या मध्यात् जेथे दोन अर्धे थ्यालामस (Thalamus) भाग मिळतात तेथील दोन हेमीस्फीयर्स (Hemispheres) च्या खांचेत (groove) दुमडलेल्या स्थितीत असते. ही पिनियल ग्लॅंड सुद्धा कल्पना करणे किंवा पुढील विचार करणे अशा कार्याशी जोडलेले आहे. पिनियल ग्लॅंड ही प्रकाश संवेदनशील असून ती प्रकाशाने कार्यरत होते, आणि मुख्यतः मेलाटोनिन (Melatonin) हे संप्रेरक (Hormone) तयार करून प्रसवते. मेलाटोनिन चे रासायनिक नांव एन-एसिटील-५-मेथोक्सी-ट्रिप्टामिन (N-acetyl-5-methoxy-tryptamine) असे आहे. हे संप्रेरक झोपणे (sleep) आणि जागणे (waking up) यांचे नियंत्रण करते. त्याचप्रमाणे पिनियल ग्लॅंड हे ड़ाय-मिथिल-ट्रिप्टामिन (Di-methyl-tryptamine) नावाचे भ्रमित करणारे रासायनिक तयार करून प्रसवते, हे आपल्या शरीरात निर्मित होणारे रसायन इतर उत्पादित रसायन जसे हिरोइन, एल एस डी ईत्यादि प्रमाणे भ्रम (भूल, नशा) देणारे असून हयामुळे समोर नसलेले दिसणे किंवा ऐकू येणे इत्यादि क्रिया होतात. त्याच प्रमाणे आज्ञा चक्राचे मुख्य कार्य म्हणजे अंतर्ज्ञान, अंतर्बोध, सहज ज्ञान, तात्कालिक ज्ञान, चांगले / वाईट, बरोबर / चूक समजण्याचे ज्ञान आहे. दृश्यमान (दृष्टीविषयक, दृग्गोचर) चेतना (जाणीव, शुद्धी, देहभान) ही मानसिक क्रिया आणि अंतर्ज्ञानात्मक पातळीवर स्पष्टता (किंवा स्वच्छपणा) ही भावनात्मक क्रिया आहेत.
७). सहस्त्रार चक्र (सहस्त्र दल कमळ , Crown Chakra) - योगाभ्यासाच्या प्रगतीनुसार जागृत झालेली कुंडलिनी मूलाधार चक्रातून वर वर सहा चक्रातून सरकत डोक्याच्या उच्च कळसावर असलेल्या अनेक-रंगी सहस्त्र दल कमळात पोहचते. या ठिकाणी कुंडलिनी शक्तीचे पुरुष शिव-शक्तीशी संयोग (मिलन) होते. या मिलनामुळे योग्याची चेतना (जाण, जाणीव) फुलारते आणि योगीचे विलीनीकरण हे दिव्य इश्वरिय चेतनेमध्ये सफल (संपन्न) होते आणि समाधी अवस्था (Liberation) प्राप्त होते. सहस्त्रार चक्राचे कार्य हे साधारणपणे पिट्युटरी ग्लॅंड (Pituitary gland) समान आहे. पिट्युटरी ग्लॅंड (एंडोक्राइन ग्लॅंड) ही हायपोथ्यालामस (Hypothalamus) च्या तळाशी तिचा विस्तार असून ही ऑप्टिक चाईस्मा (Optic chiasma) च्या मागे मेंदु (Brain) मधे असते. पिट्युटरी ग्लॅंड हे अनेक संप्रेरक (Hormones) तयार करून शरीरात प्रसवतात, त्या संप्रेरकांद्वारे बाकीच्या एंडोक्राइन ग्लॅंड प्रणालींना (Endocrine system) शरिर कार्यांसाठी सन्देश देतात आणि हायपोथ्यालामसद्वारे मध्यवर्ती मज्जातंतु प्रणालीशी (Central Nervous System) मानसिक (Mental balance) सन्तुलनासाठी जोडले जातात. हायपोथ्यालामस हा शारीरिक देहभान (चेतना Consciousness) चा मुख्य आधार / पाया आहे. त्याच प्रमाणे सहस्रार चक्राचे मुख्य कार्य म्हणजे कर्माची मुक्तता, ध्यानधारणा साठी शारीरिक क्रिया, सार्वत्रिक देहभान (चेतना) आणि अखंडता साठी मानसिक क्रिया, आणि अस्तित्वासाठी भावनाप्रधान क्रिया ही आहेत.
नमो भगवती , सरस्वती शारदे |
अज्ञानान्धकार नाशिनीं , ज्ञानप्रदे ||
नमो श्वेतवसने , श्वेतपद्मासने |
वीणापुस्तकधारीणीं , सुबुद्धिप्रदे ||
नमोsस्तुते विद्यारूपे , कलावर्धिनीं |
देहि विद्यां च ज्ञानं , सफलताप्रदे ||
१. वेद हा शब्द म्हणजे ज्ञान. मानववंशशास्त्र (व्युत्पत्तिशास्त्र) नुसार वेदाचा मूळ शब्द हा ‘विद’ असून त्याचा अर्थ समजणे, माहित होणे, ठाऊक होणे , ओळखणे, कळणे, जाणणे, असा होतो.
२. वेदांमध्ये १०८ चे पडसाद (आवाज) पूर्णतः उमटलेले आहेत. अंतिम सत्य हेच आहे कि देवापासून उत्पती (Created) , देवाच्या अंतर्गत आधार किंवा पोषण (Sustained) आणि देवामध्ये किंवा दिव्य तत्वामध्ये विलीन किंवा बरखास्त होणे (Dissolved or Merged). या प्रमाणे या विश्व किंवा ब्रमांडामधे एक तालबद्ध (लय) पद्धती आहे. या तालबद्धताला १०८ गुणक किंवा क्रमांक असे संबोधिले जाते. उदारणार्थ, जपमाळेत १०८ मणी किंवा रुद्राक्ष असतात. हे १०८ मणी मंत्र- जप करतांना क्रमाने एकेक मोजल्या किंवा ओवल्या जातात. हे मणीवरिल १०८ मंत्र-जप म्हणजे १०८ पायऱ्या ज्याच्या सहाय्याने आत्मा हा आपल्यातील दैवी ईश्वरीय शक्ती कडे पोहचतो , प्रत्येक पायरीवर तिच्या गुणधर्मानुसार क्रिया व प्रतिक्रिया घडत असतात . या प्रमाणे मनुष्य आणि ईश्वर यामध्ये वेगवेगळ्या १०८ पायऱ्यांचे अंतर आहे.
३ जैन धर्मीय आचार्य कुन्ददेव यांनी प्राचीन 'नियमसार' ग्रंथामध्ये सांगितले आहे अप्पाणं विणु णाणं णाणं , विणु अप्पगे न सन्दे हो | या जैन मंत्राचा भावार्थ असा आहे कि आत्मा आणि ज्ञान हे अन्योन्याश्रय रुपात एकमेकांशी संबंधित आहेत. आत्मा शिवाय ज्ञान आणि ज्ञाना शिवाय आत्मा यांची कल्पना होऊ शकत नाही. कारण हे ज्ञान अनेक आवरणांनी झाकलेले असते. या आवरणांना दूर करण्याच्या प्रकियेला शिक्षा म्हणतात. या शिक्षा मुळे अज्ञानाचा अन्धक्कार (आवरण) हटून (दूर होऊन) ज्ञान प्रकाशित होते. यावेळी मनुष्याचे सर्व दुख्खाचे कारण समाप्त होतात,
४, ज्ञान-प्रक्रियेला समजण्या साठी अन्तःकरणाचे स्वरूप आणि त्याचे प्रकृती म्हणजे कार्य समजून घेणे आवश्यक आहे. वेदान्त परिभाषेमध्ये अन्तःकरणाच्या वृत्तीचे चार प्रकार आणि त्यांचे कार्य खालील श्लोकात सांगितले आहे ---- मनोबुद्धिरहंकारश्चित्तं करणमन्तरं | संशयो निश्चयो गर्वः स्मरणं विषया इमे || (१/१७/१) मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हि सर्व अन्तःकरणाच्या वृत्तीचे चार प्रकार आहेत. मनाने वितर्क व संशय होतो. बुद्धी निश्चय करते. अहंकार मुळे गर्व अर्थात अहंभाव व्यक्त होतो. आणि चित्तामध्ये स्मरण होते. अन्तःकरण हे जड तत्व आहे. अन्तःकरणा द्वारे आत्माच्या प्रकाशाने ज्ञान-प्रक्रिया संपन्न (परिपूर्ण) होते.
५. गुशब्दस्त्वंधकारे स्याद रुशब्दस्तन्निरोधके | अन्धकारनिरोधित्वाद गुरुरित्यभिधीयते || गुरुगीता १९ नुसार गु शब्दाचा अर्थ अन्धकार आणि रु शब्दाचा अर्थ त्याचा निरोध किंवा विनाश करणारा असा आहे. या प्रमाणे गुरु म्हणजे अंधकाराचा निरोधक किंवा विनाशक असा होतो.
६. मानवा उठ, तू स्वतःला अज्ञानी, अबोध, मानसिक व शारीरिक कमजोरीचा , दुबळा असे समजू नकोस. लक्षात ठेव, सर्व शक्ती या तुझ्या शरीरातच आहेत. त्यांना ओळख, जाण, आणि विश्वास ठेव कि तू या जगात काहीहि व सर्वहि करू शकतो. जागृत हो आणि तुझ्यातील उपजत दैविक शक्ती व्यक्त कर. - स्वामी विवेकानंद , कॅलीफ़ोर्निया, १९९०. (All power is within you, You can do anything and everything, Believe in that. Do not believe that you are weak. As all power exits there within you, Stand up and express the divinity within you – Swami Vivekanand, California, 1990.)
चार पुरुषार्थ म्हणजे हिंदू धर्मानुसार जीवनाचे चार उद्देश्य (ध्येय, प्रयोजन) वेदांतील ज्ञानानुसार, हिंदू जीवनाचे एकंदर चार उद्देश्य खालील प्रमाणे आहेत. . (१). धर्म, (२). अर्थ, (३). काम, आणि (४). मोक्ष.
१. धर्म (प्रामाणिकपणा, कर्तव्य-परायनता, सोज्वळ वर्तणूक, समाज-नियमपालन) -
धर्म म्हणजे शब्दशः धर्म किंवा शास्त्र (सिद्धांत, नियम, कायदा), परंतु प्रत्यक्षात (वास्तविकपणे) धर्म म्हणजे सदाचरण (प्रामाणिकपणा) म्हणजेच समाजासाठी कामकर्तव्य, कुटुंबासाठी कामकर्तव्य, आणि मानवतेसाठी कामकर्तव्य, म्हणून समाजात राहतांना धर्मपालनासाठी समाजाचे नियम पाळावीत आणि समाज-उपयोगी चांगले कार्य करावीत. रामायणामध्ये श्रीराम आणि महाभारतामध्ये धर्मराज हे दोघेही धर्माचे रूप असून त्यांच्या सदाचरणामुळे त्यांना राजपद प्राप्त झाले
२. अर्थ (धनसंपत्ती किंवा जीवनावश्यक भौतिक सामान) -
अर्थ म्हणजे शब्दशः धनसंपत्ती किंवा धन मिळकती (प्राप्ती) साठी केलेले कार्य होय, याचा अर्थ असा नाही कि हिंदू धर्म धन संपादन साठी समर्थन करतो, परंतु हिंधू धर्म हा व्यक्तीच्या जीवनात पैशाचे महत्व समजतो. सामान्य मनुष्य म्हणून आनंदी जीवन जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असते परंतु हे धन पोटापुरते पुरेसे केवळ प्रामाणिक पद्धतीने कमाविलेले असावे. जर धर्म आणि अर्थ यांमध्ये संघर्ष असेल तर धर्माला अर्थापेक्षा जास्त महत्व द्यावे.
३. काम (जीवनातील आनंद आणि भौतिक व शारीरिक वस्तूंची परिपूर्णता) -
काम म्हणजे आनंद, विशेषतः लैंगिक आनंद होय. इथे काम म्हणजे सांस्कृतिक उद्योग (अभ्यास), खेळ, व जीवनातील आनंद देण्याऱ्या इतर कल्पक (निर्मितिक्षम) क्रिया इत्यादि पासून मिळालेला आनंद होय. समाजाच्या वृद्धी व प्रगती साठी अर्थ आणि काम हे महत्वाचे उद्देश आहेत. हिंदू धर्म हा फक्त आध्यात्मिक ज्ञानासाठीच आहे अशी इतर लोकांची भावना आहे, परंतु हिंदू धर्म हा अत्यंत व्यावहारिक धर्म सुद्धा आहे. हिंदू धर्म हा प्रामाणिकपणे जाणतो कि लैंगिक आनंद हा देवांनी मानवाला दिलेला अत्यंत उच्च व शुद्ध आनंद आहे. लैंगिकता हि मानवी जीवनातील महत्वाचा भाग आहे आणि लैंगिकता हि मुलभुत अंतःप्रेरणा असून तिच्या द्वारे आपल्या पुढच्या पिढीला जन्म देवू शकतो आणि मानव वंश टिकवू शकतो.
४. मोक्ष (मुक्तता) - मोक्ष म्हणजे मुक्ती (पापविमोचन).
मोक्ष म्हणजे आत्म्याचे जन्म, मृत्यु व पुनरजन्म च्या चक्रातून मुक्तता होय. हिंदू धर्म हा पुनरजन्मावर विश्वास करते. आपण आज जे आहोत, ते आपल्या गतजन्माचे कर्मानुसार आहे आणि पुढील जन्मी आपण जे होवू ते आपण वर्तमान जन्मी करणाऱ्या कर्माचे फलित राहील. या प्रमाणे आपला आत्मा जन्म व पुनरजन्म च्या चक्रामध्ये बंधिस्त झाला आहे. म्हणून आत्म्याला या चक्रातून मुक्त करण्यासाठी मोक्षाची आवश्यकता आहे, मोक्ष मिळविणे हे हिंदू जीवनाचा मुख्य उद्धिष्ट आहे. धर्म अर्थ व काम या तिन्हीद्वारे मोक्षेचा मार्ग आच्छादलेला असतो. योग्य मार्गदर्शनाने आनंद हा आध्यात्मिक अनुभवामध्ये रुपांतरीत होवू शकतो. योग्य इच्छा दाबून टाकण्यामुळे शरीराला व आत्म्याला विकार, रोग किंवा आजार येतात, त्यामुळे मोक्ष प्राप्तीला विलंब होतो. गुरूच्या कृपा व मार्गदर्शनाने मायेच्या बंधनातून मुक्तता मिळू शकते आणि आपला आत्मा परमात्म्याशी विलन होवू शकतो हिंधू धर्म हा मोक्ष कसा मिळविण्याचा यासाठी मार्ग सुद्धा सांगते. ह्याकरिता या उद्धिष्ट पूर्तीसाठी हिंदू जीवन हे चार विभागात म्हणजे चार आश्रमात विभागले आहे.
१ , ० , आणि ८ :
१ = म्हणजे देव, ईश्वर किंवा उच्चोत्तम परम सत्य,
० = म्हणजे रिक्त, पोकळी, किंवा अध्यात्मिक अभ्यासातील किंवा सरावातील पूर्णत्व, आणि
8 = म्हणजे अनंतकाल, शाश्वतता, अमर्याद
हर्षद हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ परमानंद आहे. १०८ ही हर्षद संख्या आहे. हर्षद संख्या म्हणजे असा पूर्णांक ज्याला त्याच्या अंकांच्या बेरजेने (१+०+८=९) भाग जाऊ (१०८/९=१२) शकतो.
१०८ = म्हणजे ईश्वरीय किंवा दैवीक पूर्णता, म्हणजेच संपूर्ण परिपूर्णता
१ + ० + ८ = ९ = ब्रह्मा देव (विश्व निर्माता)
गुण विभाजन – ११ x २२ × ३३
विभाजक - १, २, ३, ४, ६, ९, १२, १८, २७, ३६, ५४, १०८.
वेदांमध्ये १०८ चे पडसाद (आवाज) पूर्णतः उमटलेले आहेत. अंतिम सत्य हेच आहे कि देवापासून उत्पती (Created) , देवाच्या अंतर्गत आधार किंवा पोषण (Sustained) आणि देवामध्ये किंवा दिव्य तत्वामध्ये विलीन किंवा बरखास्त होणे (Dissolved or Merged). या प्रमाणे या विश्व किंवा ब्रमांडामधे एक तालबद्ध (लय) पद्धती आहे. या तालबद्धताला १०८ गुणक किंवा क्रमांक असे संबोधिले जाते.
१. हिंदू धर्मामध्ये भगवद्गीतेचे १८ अध्याय, १८ पुराण आणि १०८ उपनिषद आहेत. ही सर्व ग्रंथ संपदा आपल्या प्राचीन (सनातन) ऋषी मुनींनी दिलेली ज्ञान संहिता (पाठ्यपुस्तक) आहेत.
२. जपमाळेत १०८ मणी किंवा रुद्राक्ष असतात. हे १०८ मणी मंत्र - जप करतांना क्रमाने एकेक मोजल्या किंवा ओवल्या जातात. हे मणीवरिल १०८ मंत्र-जप म्हणजे १०८ पायऱ्या ज्याच्या सहाय्याने आत्मा हा आपल्यातील शरीरांतर्गत दैवी ईश्वरीय शक्ती कडे पोहचतो, प्रत्येक पायरीवर तिच्या गुणधर्मानुसार क्रिया व प्रतिक्रिया घडत असतात. या प्रमाणे आपल्यातील मानवी जागृती (चेतना) व आपल्यातील शरीरांतर्गत दैविक ज्योति-प्रकाश ह्यामध्ये १०८ पायऱ्या आहेत,
म्हणजेच मनुष्य आणि ईश्वर यामध्ये वेगवेगळ्या १०८ पायऱ्यांचे अंतर आहे.
म्हणजेच आत्मा म्हणजे आपल्या शरीरातील जीव (चैतन्य किंवा मध्यवर्ती केंद्र) हा आत्मा परमात्माशी मिलन करण्याच्या साठी १०८ पायऱ्या किंवा टप्पे प्रवास करतो.
२.१. शैव (पंथीय) संप्रदायामध्ये मुख्य शिव गण १०८ आहेत. जपमाळेत १०८ मणी असतात. या जपमाळे मुळे मंत्राची मोजणी, प्रामाणिकपणा, भक्ती, भावना आणि पूर्ण लक्षपूर्ण ध्यान यासाठी मदत होते. २.२. लिंगायत पंथीय १०८ रुद्राक्षाची जपमाळा वापरतात, तसेच दररोज सकाळी शिवपूजा करतांना सर्वोच्च देव शिव महादेवाची १०८ नावे (अष्टाशतनामावली) या रुद्राक्षमाळेवर जपतात. २.३. गौडीय वैष्णव (पंथीय) संप्रदायामध्ये (कृष्ण पद्धती), १०८ गोपींचे (कृष्णाच्या सानिध्यातील वृन्दावनातील मैत्रिणी) नावे घेण्यासाठी १०८ मण्यांची जपमाळा वापरतात.
३. वैष्णव पंथामधील, विष्णु देवाची १०८ दिव्य-क्षेत्र (पवित्र तीर्थ स्थान) भारत व नेपाळ मध्ये आहेत, ह्यांना १०८ दिव्य देशम म्हणतात.
नेपाळातील मुक्तिनाथ मध्ये १०८ पाण्याच्या तोटी (मुख) आहेत.
४. श्री - यंत्रावर ५४ छेद स्थान आहेत. म्हणजे जिथे तीन रेषा एकमेकाशी छेदून ५४ असे छेद स्थान बनतात. प्रत्येक छेद स्थान हे पुरुषरुप (शिव) आणि स्त्रीरूप (शक्ती) असे दोन गुणधर्माचे असतात, म्हणजेच एकंदर ५४ x २ = १०८ छेद स्थान आहेत. याप्रमाणे १०८ केंद्रांद्वारे श्री-यंत्र आणि मानव-शरीर छेदल्या गेले आहेत. श्रीयंत्र हे ५४ पेंटागॉन यांनी बनलेले आहे. पेंटागॉन मध्ये कोपरा (कोन angle) म्हणजे दोन लगतच्या रेषांच्या छेदनाने होणारी मधली जागा ही १०८ अंशांची असते. ५. मर्म किंवा मर्मस्थान ही शक्ती छेद- केंद्र असून त्यांना चक्र असे म्हणतात. आपल्या सूक्ष्म शरीरात अशी १०८ शक्ती-छेद- केंद्र आहेत. चवथ्या योगिक चक्रामध्ये, शक्ती रेषांचे १०८ छेद- केंद्र एकवटून हृदय-केंद्र बनते, आणि त्यापैकी एक सुषुम्ना छेद-शक्ती-रेषा पुढे सहस्त्रार चक्राकडे जाते, यालाच योग शास्त्रामध्ये आत्म-परिपूर्तता (सत्य-ज्ञानपूर्ती) म्हणतात.
६. तंत्र योगानुसार, आपल्या शरीरात एका मिनिटात साधारणताः १५ श्वासोच्छ्वास चालतात, म्हणजे एक तासात ९०० वेळा, १२ तासांत १०,८०० वेळा आणि २४ तासांच्या पूर्ण एक दिवसात २१,६०० वेळा श्वासोच्छ्वास चालतात, यापैकी १०,८०० हे सूर्याची सौर शक्ती व १०,८०० हे चंद्राची चांद्र शक्ती आहेत. (१०८x१०० =१०,८०० आणि २x१०,८०० =२१,६००).
आपल्याला १०८ वेळा जप श्वासोच्छ्वास द्वारे ७ मिनिट १२ सेकंद वेळात होऊ शकतो. वेदात दिल्याप्रमाणे, जपाचे १००% यश / फळ मिळण्यासाठी, १०८ मण्यांची जपमाळ हिला १०० वेळा एकंदरीत १२ तासांत श्वासोच्छ्वास द्वारे मंत्र जपावे लागतात.
७. पौराणिक कथा (Mythology) प्रमाणे एकंदर ४ युग आहेत. सर्व युग १०८ व ९ शी संबंधित आहेत . १). सत्य युगात - १,७२,८०० वर्ष (१+७+२+८ = १८ = (१+८ = ९ )
२). त्रेता युगात - १२,९६,००० वर्ष (१+२+९+६ = १८ = (१+८ = ९ )
३). द्वापार युगात - ८,६४,००० वर्ष (८+४+६ ) = १८ = (१+८ = ९ )
४). कली युगात - ४,३२,००० वर्ष (४+३+२ ) = ९
८. इच्छा - मानवात शक्य होऊ शकणाऱ्या एकंदर १०८ इच्छा (ऐहिक वासना) असतात.
थापा - मानवाच्या सांगण्या-बोलण्यात एकंदर १०८ थापा (खोटेपणा) असतात.
भ्रम - मानवात एकंदर १०८ प्रकारांचे भ्रम (स्व-कल्पित) किंवा अज्ञानीपणा असतात.
९. पवित्र गंगा नदी ही १२ अंश (७९ ते ९१) रेखांशांत आणि ९ अंश (२२ ते ३१) अक्षांशांत जोड करून वाहते. १२ x ९ = १०८
१०. वेदांत देव व देवी यांची प्रत्येकी १०८ मुख्य नावे दिली आहेत. त्यांना त्या देव किंवा देवीची अष्टोत्तरशत नामावली म्हणतात.
११. ध्यान योगात एकंदर १०८ प्रकारांचे ध्यान (meditation) वर्णिले आहेत.
१२. विष्णुचा सहाव्वा अवतार हा परशुराम. ह्याने सरस्वती नदी कोरडी झाल्या नंतर १०८ धन्वंतरीच्या (आयुर्वेदाचा देव) मूर्ती स्थापन केल्यात.
१३. नृत्य (नाच, Dance)
१. हिंदुस्थान पद्धती मध्ये १०८ प्रकारचे भिन्न नृत्य-प्रकार आहेत.
२. भगवान शिवशंकर हे नटराज रूपांत त्यांचे वैश्विक नृत्य भिन्न १०८ मुद्रा (स्थिती) मध्ये
नाचतात. तांडव नृत्यात १०८ करण (स्थिती) आहेत. शिवाच्या या नृत्यातील वैश्विक स्थिती
ह्यांना यौगिक-व्यायाम, मार्शल-आर्ट व कुंग-फु मध्ये वापरतात.
३. भागवत पुराणांत वर्णिले आहे कि रासक्रिडा मध्ये भगवान कृष्ण हे १०८ गोपींसह नृत्य
करतात.
१४. आयुर्वेद वैद्यशास्त्रानुसार, आपल्या शरीरात १०८ दबाव (दाब) केंद्र असे आहेत कि जेथे देहभान (शुद्धी, जाणीव) आणि देहातील मांस एकमेकांशी छेदून गेल्यामुळे बेशुद्ध किंवा अचेतन माणसाला जीवन प्राप्त होते.
१५. संस्कृत बाराखडीमध्ये, एकंदर ५४ अक्षर असून प्रत्येक अक्षर पुरुष-रुप (शिव) आणि स्त्री-रूप (शक्ती) असे दोन स्वरूपात असतात, म्हणजेच एकंदर ५४ x २ = १०८ अक्षर आहेत.
१६. आपले विश्व रसायन शास्त्रानुसार (केमिस्ट्री) १०८ मूलद्रव्य यांनी बनले आहे. आधुनिक Periodic Table मध्ये १०८ मूलद्रव्य आहेत. १०८वा हेस्सियम Hassium ह्या मूलद्रव्याला १०८ प्रोटान्स आहेत.
१७. १२ एप्रिल १९६१, पहिला अंतरिक्षय मानव युरी गागरीन, हा १०८ मिनिटे अंतराळात होता.
१८. गोल्फ चेंडूवर १०८ च्या पटीने खळी (dimples) असतात.
१९. एफ एम रेडियोची फ्रीक्वन्सीची वरील मर्यादा १०८ MHz असते.
खगोलशास्त्र (Astrology)
१. खगोलशास्त्रानुसार आपले विश्व हे १२ विभागात (घर) छेदलेले असून त्यात एकंदर ९ ग्रह आहेत. असेच जन्म - कुंडलीतहि राशिचक्र दाखविले जाते. १२ राशि घर x ९ ग्रह = १०८.
२. खगोल शास्त्रात २७ नक्षत्र असून प्रत्येक नक्षत्राला ४ दिशा आहेत. २७ नक्षत्र x ४ दिशा = १०८. म्हणजे, याचा अर्थ असा कि १०८ च्या आच्छादनाने आपले विश्व पूर्णतः झाकलेले आहे.
२. पृथ्वी आणि चंद्र यामधील अंतर हे चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे.
पृथ्वी आणि सूर्य यामधील अंतर हे सूर्याच्या व्यासाच्या १०८ पट आहे.
सूर्याचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पट आहे.
ही सर्व अंतर व व्यास आधुनिक मोजमापाने बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहेत. म्हणून, १०८ संख्या ही विश्वाची निर्मिती (विकास) आणि विश्वाचा निर्माता (देव किंवा दैचिक शक्ती) यातील संबंध प्रकट करते.
१. कॅम्बोडिया देशात, प्रसिद्ध अंगकोर वेट (Angkor waat) नावाच्या मंदिरामध्ये हिंदू कथेतील समुद्रमंथन दाखविले आहे, यात क्षीरसागरा मध्ये मंदार पर्वताची रवी आणि या रवीला घुसळण्या साठी शिवशंकराच्या गळयातील वासुकी नागाची दोरी पर्वताभोवती वेटोळी करून वापरली आहे. मंदार पर्वताला मागे पुढे ओढण्यासाठी नागाच्या शेपटीकडील भागाकडे ५४ देव एकीकडे आणि तोंडाकडील भागाकडे ५४ राक्षस दुसरीकडे असे एकंदर १०८ गण मंदार-रवी घुसळून क्षीरसागरातून अमरत्वाचे औषध म्हणजे अमृत काढतात. ही पौराणिक कथा हिंदू धर्मातीज भागवत पुराण, महाभारत आणि विष्णु पुराणात दिलेली आहे.
२. कम्बोडिया देशात, प्रसिद्ध अंगकोर थोम (Angkor Thom) नावाच्या मंदिरामध्ये हिंदू कथेतील समुद्रमंथन दाखविले आहे, या मंदिरात, स्मारक-स्वरूपात एकंदर ५ संरक्षक दरवाजे (द्वार)असून प्रत्येक द्वारासमोर फुटपाथ आहेत. या फुटपाथाच्या डाव्या बाजूस ५४ देवांचे (सुर) पुतळे आणि उजव्या बाजूस ५४ राक्षसांचे (असुर) पुतळे आहेत. हे दृश्य हिंदू धर्मातील समुद्रमंथन दर्शविते.
३. प्राचीन युरोप मध्ये ख्रिस्तीधर्म येण्यापूर्वी प्राचीन वैदिक काळातील ऋषींनी स्टोनहेङ्गे नावाचे (Stonehenge) १०८ फुट व्यासांचे दगडाचे स्मारक-पुतळे उभारलेत.
१. धार्मिक पूज्यनीय अरिहंत १०८ आहेत.
२. तिबेटीयन बुद्धिष्ट १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.
३. झेन (Zen) धर्मगुरू (पाद्री) प्रार्थनेसाठी जुझू (juzu) नावाची १०८ मण्यांची जपमाळ त्यांच्या मनगटा भोवती वापरतात
४. च्याईनीज बुद्धिष्ट आणि टावोइष्ट (Taoists) हे सुच्यू (su-chu) नावाची १०८ मण्यांची जपमाळ वापरतात. ह्या माळेत तीन विभाजक मणी असतात म्हणून ही माळा तीन भागात विभागते, व प्रत्येक भागात ३६ मणी असतात.
५. शोषु (Shoshu) बुद्धिष्ट उपासक (अनुयायी) १०८ मण्यांची जपमाळ वापरतात. हे उपासक खालील सूत्र राबवितात - ६ x ३ x २ x ३ = १०८
६ जाणीव-संवेदना (senses) :- [दृष्टी (पाहणे), ध्वनी (ऐकणे), वास (हुंगणे), स्वाद
(चाखणे), स्पर्श (शिवणे), विचार (चिंतणे / कल्पणे)]
३ काळाचे स्वरूप :- [भूत , वर्तमान , भविष्य]
२ हृदयाची स्थिती :- [शुद्ध किंवा अशुद्ध]
३ अभिप्रायाच्या शक्यता (भावना) :- [आवड, नावड, दुर्लक्षित]
६. च्याईनीज खगोलशास्त्रानुसार १०८ पवित्र तारे (चांदण्या) आहेत.
७. लंकावतार-सूत्र या ग्रंथाच्या एका भागात बोधीसत्त्व महामती ही बुद्धाला १०८ जगाच्या जडवादविषयक प्रश्न विचारते आणि दुसऱ्या भागात बुद्ध नकाराचे १०८ विधाने निवेदन करतात
८. बुद्धीईजम मध्ये १०८ प्रकारच्या भावना मानतात, त्यापैकी ३६ भूत काळाच्या, ३६ वर्तमान काळाच्या आणि ३६ भविष्य काळाच्या असतात.
९. काही बुद्धिष्ट चांगल्या नाशिबासाठी अक्रोडावर १०८ छोटे बुद्ध कोरतात.
१०. जपान मध्ये बुद्धिष्ट मंदिरात वर्ष-समाप्ती आणि नववर्ष-प्रारंभ (स्वागत) यासाठी वर्षाच्या शेवटी १०८ वेळा घन्टा वाजवितात. प्रत्येक घन्टा म्हणजे १०८ पैकी प्रत्येक संभवनीय मोह घालवितात, त्यामुळे एकंदर १०८ सद्गुण वाढतात आणि १०८ दुर्गुण टळतात आणि निर्वाण पद (Salvation मुक्ती, मोक्ष) प्राप्त होते, असा समज आहे.
इस्लाम धर्मात १०८ चा उल्लेख जगन्नियंता भगवान (परमेश्वर) असा करतात.
जैन धर्मातील महत्व
जैन धर्मात ५ धार्मिक पवित्र सद्पुरुष्यांचे १२, ८, ३६, २५, आणि २७ असे अनुक्रमे मिळून एकंदर १०८ सद्गुण वर्णिले आहेत.
शीख परंपरा मध्ये मण्यांच्या जपमाळे ऐवजी लोकरीच्या धाग्यांनी बांधलेल्या १०८ गाठींची जपमाळ वापरतात.
अमृत म्हणजे असे समजतात कि हे देवांचे पेय असून या पेयाने देवांना अमरत्व प्राप्त होते. पुरातन काळी, देव लोकं हे दुर्वास ऋषींच्या श्रापामुळे शक्तीहिन झाले होते. म्हणून, देव लोक ह्यांनी त्यांच्या मर्त्य (मरणाधीन, mortal) शत्रू सोबत क्षीरसागर घुसळून समुद्र- मंथन सुरु केले आणि त्या वेळी तिथे आश्चर्य चकित करणारे चौदा रत्नें प्रगटली. .ह्या पैकी, शेवटले चौदावे रत्न हे अमृत होते. हे अमृत अमरत्व प्राप्तीचे रामबाण औषध असून ते देवांचे वैद्य ‘धन्वंतरी’ ह्यांनी भांड्यात धरलेले असे प्रगटले.
हिंदू तत्वज्ञानातील यौगिक ग्रंथांनुसार ध्यानाच्या अति उच्चं स्तिथीत नशिली वस्तू युक्त द्रव योगींच्या शरीरांत श्रवते, या द्रव्यामुळे तरतरी , हर्षोन्माद , नशा (intoxicating effect) मिळते .ह्यांचं द्रव्याला अमृत म्हणतात. अति उच्चं ध्यानामुळे ट्रिप्टोफॅन (tryptophan ).चे रूपांतर मेलॅटोनीन (melatonin या हॉर्मोन (hormone) मध्ये होऊन पिनियल ग्लॅन्ड (pineal gland, 6th Yogik chakra or Brow Chakra, between the eyes in the center of the forehead) कार्यक्षम किंवा जागृत होऊन अमृत हे द्रव्य श्रवते व व या जागृतीमुळे पिनियल ग्लॅन्ड हि हजारो सूर्याच्या प्रकाशा प्रमाणे पांढऱ्या रंगाचे चमकते आणि DMT (N,N-Di-Methyl-Tryptamine) हे LSD सारखे कार्य करणारे रासायनिक द्रव्य (Chemical) निर्मित करते . आणि नंतर पिट्युटरी ग्लॅन्ड (pituitary gland, 7th Yogik Chakra or Ajna Chakra, Third Eye Center) द्वारे घसाच्या खाली वाहते व हृदयाला पोहचून क्रिया घडविते. ह्या श्रवणाने योगी साधकाला कालविरहित आणि स्वदेवत्व यांचा अनुभव येतो . फक्त एक थेम्ब असे अमरत्व मिळविण्याला पुरेसा असतो. आणि म्हणून मुक्ती , मोक्ष , स्वातंत्र्य किंवा मोकळीक म्हणजेच जन्म - मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता किंवा सुटका मिळते.
आत्मा हा एक सर्वसामान्य शब्द असून तो मूलभूत अंतिम वस्तुस्थिती दर्शवितो. आत्मा शब्दाचे वर्गिकरण हे जीवात्मा आणि परमात्मा अशा दोन प्रकारात होवू शकते. जीवात्मा म्हणजे शरीरासह माझी व तुमची मूलभूत वस्तुस्थिती दर्शविणे म्हणजेच प्रकृती व आत्मा मिळून जीवात्मा होतो. परमात्मा म्हणजे सर्व आत्म्यांचा एकुलता एक असणारा परम आत्मा म्हणजेच परमेश्वर (देव) किंवा ब्रम्ह असा अर्थ होतो. आत्मा व परमात्मा ह्या दोघांना प्रतिपादन करणारे कोणतेही घटक (तत्व) नाहीत, त्यांना नाव, आकार, शरीर नाहीत, तसेच मन देखील नाहीत त्यामुळे हे विचार व विकार रहित असून अतिशय शुद्ध व पवित्र आहेत. ह्या दोघांचे व्यक्तीत्व आपल्या ज्ञान, अज्ञान व बुद्धी पलीकडील आहेत. आत्मा व परमात्मा म्हणजे सार्वभौमिक (सार्वत्रिक) दैविक तत्व असून ही दोघेही मूलभूत अंतिम सत्य आहेत.
आत्मा म्हणजे देवाचा प्रकाश (चैतन्य), हा आत्मा प्रत्येक जिवंत प्राण्यांत जीवनाचा प्रकाश म्हणून उपलब्ध असतो. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे म्हणून आत्मा हा परमात्म्याच्या रुपात निसर्गात उपलब्ध आहे. जसे एखाद्या झाडाचे बी मध्ये त्या झाडाचे गुणधर्म असतात, तसेच आत्मामध्ये सुद्धा परमात्म्याचे सर्व गुणधर्म असतात. आत्मा म्हणजे स्वतःचे सत्य स्वरूप. आत्मा म्हणजे अनादि (शाश्वत, अनंत) व अपरिवर्तनीय (ना मरणारे, ना बदलणारे आकार, वर्तणूक व शक्ती) असलेले कोणाचेही मुलभूत स्वतंत्र स्वरूप आहे भगवद्गीतेमध्ये (BG - २.२०) श्रीकृष्णाने आत्म्याबद्दल असे सांगितले कि कोणत्याही काळी किंवा समयी, आत्म्याला जन्म अथवा मृत्यू नाही, आत्मा हा अपरिवर्तनशील असून अजन्मा, अनंत (अनादि), सदा विद्यमान, आणि इतिहासपूर्वकालीन आहे. जरी शरीर मेले तरी आत्मा मरत नसतो, आत्मा अमर अविनाशी आहे भगवद्गीतेमध्ये (BG - २.२३) श्रीकृष्णाने आत्म्याबद्दल असे सांगितले कि आत्म्याला कोणत्याही शस्त्राने अलग-अलग तुकड्यांमध्ये कापू शकत नाही, तसेच आत्म्याला जाळू शकत नाही, पाण्याने ओले करू शकत नाही, वाऱ्याने वाळवू शकत नाही. परंतु, उपनिषदामध्ये (Ait. Up -१) सांगितले कि आत्मा हा प्रत्येक जीवनधारी मध्ये असतो म्हणून आत्म्याला ब्रह्मन किंवा देव म्हणतात. जग उत्पत्तीच्या आधी पासून आत्मा रुपी देव अस्तित्वात आहे किंवा फक्त आत्माच एकटा सुरवाती पासून आहे
जीवात्मा म्हणजे जीवात्मा म्हणजे व्यक्तिगत जीव म्हणजे जीवात्मा हा व्यक्तीमधील आत्म्याचे प्रतिबिंब आहे. भगवद्गीतेमध्ये (BG - २.२३) श्रीकृष्णाने आत्म्याबद्दल असे सांगितले कि हे पराक्रमी (शक्तीमान) धनुर्धारी (शस्त्रधारी) अर्जुना, या तुच्छ जगतातील जिवंत लोक तसे पाहिल्यास निर्जिव लोक असून त्यांच्यात माझीच श्रेष्ठ चैतन्य शक्ती आहे. या भौतिक शरीरातील जीवाला जीवात्मा म्हणतात, या जीवात्म्यात देवाची ज्ञानग्रहणक्षम आणि अनादि शक्ती आहे भगवद्गीतेमध्ये (BG - १५.७) श्रीकृष्णाने आत्म्याबद्दल असे सांगितले कि, या भौतिक जगतातील सर्व जिवंत प्राणी हे श्रीकृष्णाचे शाश्वत (अनादि) अंशरुपी भाग आहेत, परंतु बिकट स्थितीमुळे ते सर्व मन इत्यादी सहा संवेदनशील भावनांशी खूप भांडतात.
परमात्मा दैविक परम तत्व असून त्यालाच आपण देव, परम स्व-तत्व, सत्य, प्रेम, आनंद असे म्हणतो. परमात्मा म्हणजे सर्वात श्रेष्ठ परम आत्मा होय. जर शरीराचे स्व तत्व आत्मा आहे, तर आत्माचे स्व तत्व परमात्मा आहे, म्हणून परमात्मा हा आत्म्यांचा आत्मा आहे. भगवद्गीतेमध्ये (SB - ११.२६.१) असे सांगितले आहे कि, परमात्मा रुपी आनंद-सागर सर्व जिवंत प्राणीमात्रेच्या आत्म्यामध्ये असतो. मूलभूतपणे देवाचे ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान याप्रमाणे तीन रुपे किंवा अद्ययावत स्थिती आहेत. ऋग्वेदात परमात्मा शब्द कुठेही सापडत नाही, परंतु परमात्म्याला ईश म्हणून संबोधलेले आहे. भगवद्गीतेमध्ये (SB - १.२.११) असे सांगितले आहे कि, जो विद्वान (ज्ञानी, सुशिक्षित) आध्यात्मिक पंडित संपूर्ण सत्य जाणतो, तोच या असंयुक्तिक, अविभाजित एकमेव सत्याला ब्रह्मन, परमात्मा किंवा भगवान असे म्हणतो. ह्या तिघांमध्ये, ब्रह्मनमध्ये कोणतीही गुणविशेषता, क्रिया व शक्ती नाही, परमात्मामध्ये थोड्या प्रमाणात काहीं शक्ती असून हा प्रत्येक सजीव प्राण्यांच्या आत्म्यात किंवा हृदयात राहतो (वस्ती करतो), परंतु भगवानमध्ये संपूर्ण शक्ती, सर्व लिला (खेळ, करमणूक) आणि सर्व गुणविशेषता असते. जीवात्मा आणि परमात्मा ह्यांतील मुख्य फरक असा कि जीवात्मा हा मायाधीन ,असून तो मायेच्या प्रभावा (दबाव) खाली असतो, परंतु परमात्मा हा मायाधीश म्हणजे तो मायेचा ईश्वर आहे, आणि आत्मा किंवा जीवात्मा आणि माया ह्या दोघांच्या वर जो एकच ईश्वर सत्ता गाजवितो त्याला देव, भगवान, परमात्मा इत्यादी नावानी ओळखतात.
तत्वज्ञानानुसार माझी ओळख व अस्तित्व काय ? , मी कोण आहे ? असे प्रश्न मनात उदभवतात. मी शरीर, मन, गुण,विचार, भावना किंवा इतर काही विशिष्ट या पैकी आहे असा विचार करतांना आपल्याला आपले स्व-तत्वाचे अतिसूक्ष्म स्वरूप त्याच्या मुलभूत ज्ञानासह समोर येते आणि शेवटी आपल्याला समजते कि आपण तत्व, गुण यापैकी काहीही नसून असा अनुभव येतो कि आपल्यातच राहणारे दैविक स्व-तत्वाचे मूलतत्व (अर्क) असून ते शाश्वत (अनादि अनंत), अमर्यादित (विस्तीर्ण) व अविकारी (अक्षय) असून त्याचे नाव सत्चिदानंद (सत-चित-आनंद) आहे.
• सत – (truth) सत्य
• चित – (consciousness) चैतन्य (चेतना, जाणीव, शुद्धी, देहभान)
• आनंद – (bliss) परमानंद, धन्यता, कल्याण
व्युत्पत्ती शास्त्रानुसार ओमचे मूळ (आरंभ, उगम) अस्पष्ट आहे. अर्वाचिन भारतात कांही विद्वान मंडळी या ओमला वैश्विक ध्वनी किंवा गूढ अक्षर किंवा काहीतरी दैविक शक्ती किंवा उपनिषदातील अध्यात्मिक तत्वाचे सार समजतात जसे ऋग्वेद (१.१.१) संहिता मध्ये खालील प्रमाणे दिलेले आहे -- ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होतारं रत्नधातमम् ॥१॥ ऋग्वेद (१.१.१) ऐतरेय अरण्यक (२३.६,) मध्ये ओम अक्षराची पुष्टी स्वरबद्ध लय जी ईशस्तोत्र पदाला शक्ती व गती देते अशी ओळख केली आहे. ज्या प्रमाणे पद-गाण्यासोबत तथा या शब्दाला मान्यता आहे, तसेच ईशस्तोत्र पदासोबत ओम (ॐ) ला मान्यता (प्रतिगर) आहे. परंतु ओम हा दैविक असून तथा हा मानवीय शब्द आहे. ओम या शब्दाचा उच्चार मंत्राच्या आरंभी व शेवटी करतात.
ॐ ओम हा विश्व उत्पत्ती (निर्मिती) च्या आधीपासून अस्तित्वात असलेला ध्वनी आहे. ही ओम ह्या शब्दाच्या ध्वनी समान नैसर्गिक गुणगुणारी शक्ती आहे.आज आपल्याला माहित आहे कि एका प्रकारची शक्ती ही दुसऱ्या स्वरूपांत रुपांतरीत होवू शकते - विद्युत शक्तीचे ध्वनी मध्ये, विद्युत शक्तीचे अग्नी मध्ये, अग्नीचे विद्युत शक्ती मध्ये वगैरे रुपांतर होवू शकते. आईन्सटेन (Einstein – E=mc2) च्या प्रसिद्ध सूत्रानुसार सर्व भौतिक पदार्थ हे शक्तींचे लाटा (waves) आहेत. म्हणून शक्ती जेव्हा हे भौतिक विश्व उत्पत्तीचा विचार करते, तेव्हा ती शक्ती अस्तित्वात असलेली ओमची स्पंदन (कंपन) करणारी गुणगुणारी ध्वनीचा उत्पत्तीसाठी वापर करते. आपल्या शरीरा सभोवती आणि शरीराच्या आंत हीच स्पंदन करणारी शक्ती असते. शरीरातील आंतरिक ध्वनीला अंतर-नाद म्हणतात. हा अंतर-नाद आपण शुद्ध अन्तःकरणाने ध्यान स्थितीत ऐकू शकतो.
ओम (Auṃ, Sanskrit: ॐ) हा पवित्र ध्वनी (नाद, स्वर) आहे. हिदू, बुद्ध, आणि जैन धर्मातील हा मंत्र आहे. हिंदूधार्मिक पंथातील ही आध्यात्मिक प्रतिमा आहे, ह्या प्रतिमेला शरीरांतर्गत आत्मा आणि ब्रम्ह म्हणजे विश्वाची अंतिम मुलभूत वास्तविकता (सत्यपणा), सत्यता, दैविक परम परमात्मा, वैश्विक तत्व व ज्ञान असे संबोधतात.
ॐ ओम (Auṃ) हा शब्द तीन अक्षरांनी बनलेले आहे - आ,ऊ,म ( 'A-U-M' ), हे तीन अक्षर खालील प्रमाणे वेढले जातात.-
(१). तीन परम शक्ती रूप - आत्मा , जीवात्मा (शरीरांतर्गत ) आणि परमात्मा
(२). तीन मुलभूत विश्वचालक देव - ब्रह्मा - जन्म, उत्पत्ती (creator), विष्णु - पालनपोषण (sustainer), आणि शिवशंकर - संहार, नाश, मृत्यू (destroyer).
(3). तीन देह (शरीर) - ठोस , सूक्ष्म , उद्भवित (gross, subtle and causal) ,
(४). तीन देहस्थिती - जागृतावस्था (जागृती, waking ), निद्रावस्था (सुषुप्ती, deep-sleeping), आणि स्वप्नावस्था (स्वप्न, dream)
(५). तीन मनःस्थिती - सावध, अर्ध-सावध, बेसावध (conscious, subconscious and unconscious).
(६). तीन जीवन-स्थिती - जन्म, अस्तित्व आणि मृत्यू
(७). तीन प्रकारांची गुण - .तामस (अंधार, आळस (सुस्ती), अज्ञान) , राजस (आवेग (तीव्र भावना), क्रियाशील (कामसूपणा), उत्साह) , आणि सत्त्व (शुद्धता, सत्य, प्रकाशमान) .
(८). तीन लोकवस्ती - स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ
(९). तीन जग (विश्व) - पृथ्वी, वातावरण, आणि स्वर्ग
(१०). तीन काळ - वर्तमान, भूत , भविष्य (Present, Past and Future)
(११). तीन दिनमान काळ - सकाळ, दुपार, आणि संध्याकाळ
(१२), तीन ऋतु - उन्हाळा, पावसाळा, आणि हिवाळा ,
म्हणून, ओम हे देवाचे निर्गुण आणि सगुण असे दोनही स्वरूप दर्शविते. म्हणून ओम ला प्रणव म्हणतात. प्रणव म्हणजे जीवन व्यापलेले आणि प्राण किंवा श्वासासोबत असलेले पूर्ण सत्य आहे. म्हणून, मंत्रांत व तसेच पवित्र स्थानी, पूजेत, घरांत किंवा मंदिरांत, सर्वत्र ओम या शब्दाला आध्यात्मिक पूर्तता म्हणून वापरतात.
अलग-अलग लिपी किंवा संस्कृती मध्ये ॐ ओम ची प्रतिमा किंवा प्रतीक
ऐतरेय ब्रह्मण उपनिषद (५.३२,) मध्ये सागितले आहे कि हे ओमचे तीन घटक हे विश्व उत्पत्तीचे तीन पायऱ्या (टप्पे) आहेत. आणि जेंव्हा ओम शब्द म्हणतात किंवा वाचतात, त्या वेळी आपण विश्व-उत्पत्ती-शक्ती ची प्रशंसा (स्तुती) करतो. अलौकिक (संदिग्ध) ध्यानधारणे नंतर शिल्लक राहते ते म्हणजे मंत्रौच्चार स्तब्धता व संपूर्ण शांतता जे आमत्र (amatra) म्हणून ओळखल्या जाते. "ओम नमः शिवाय" हा शिव (शंकर) देवाचा पवित्र मंत्र आहे, असे वेदांत आणि शैव पंथीय मध्ये सांगितले आहे. न म्हणजे झाकलेली (लपलेली) कृपा, मः म्हणजे विश्व , शि म्हणजे शिव , वा म्हणजे गौप्यपणे प्रगट होणारी कृपा , य म्हणजे आत्मा . तसेच स्तवन च्या पुरातन सूत्रात पांच तत्व देखील खालील प्रमाणे गुंफलेले आहेत - न म्हणजे पृथ्वी, मः म्हणजे जल , शि म्हणजे अग्नी, वा म्हणजे वायू य म्हणजे आकाश अशी आहेत. असे पुष्कळशे अर्थ सांगितले आहेत. सर्वसाधारणपणे 'ओम नमः शिवाय ' म्हणजे "शिव देव जो सर्वांतील चैतन्यरूपी परम सत्य आहे त्याला नमन करतो" असा आहे.
ओम णमो अरिहंताणं |
ओम णमो सिद्धाणं |
ओम णमो आयरियाणं |
ओम णमो उवज्झायाणं |
ओम णमो लोए सव्व साहुणं |
एसो पंच णमोक्कारो ,
सव्व पावप्पणसणो |
मंगलाणं च सव्वेसिं ,
पढमं हवई मंगलं ||
ooooooooooooooooooooooooo
मी अरिहंतांना नमस्कार करतो
मी सिद्धांना नमस्कार करतो
मी आचार्यांना नमस्कार करतो
मी उपाध्यायांना नमस्कार करतो
मी सर्व साधुंना नमस्कार करतो
हे पांच परमेष्ठी आहेत,
सर्व पापांचा पूर्ण नाश करतात.
आणि सर्व मंगलांमध्ये
हे सर्वांत प्रथम मंगल आहे
ooooooooooooooooooooooooo
अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधु - हे पांच परमेष्ठी आहेत, (या पवित्र आत्म्यांना शुद्ध भावपूर्वक केलेला पंच नमन चे उच्चारासह केलेले नमस्कार हे) सर्व पापांचा पूर्ण नाश करतात. आणि सर्व मंगलांमध्ये हे सर्वांत प्रथम मंगल आहे (संसारातील सर्वात उत्तम मंत्र आहे).
Namo Arihantanam: I bow down to Arihanta,
Namo Siddhanam: I bow down to Siddha,
Namo Ayariyanam: I bow down to Acharya,
Namo Uvajjhayanam: I bow down to Upadhyaya,
Namo Loe Savva-sahunam: I bow down to Sadhu and Sadhvi.
Eso Panch Namokaro: These five bowings downs,
Savva-pavappanasano: Destroy all the sins,
Manglananch Savvesim: Amongst all that is auspicious,
Padhamam Havei Mangalam: This Navkar Mantra is the foremost.
अरिहंत मध्ये दोन शब्द आहे –
(१) अरि म्हणजे शत्रू, वैरी आणि
(२) हन्त म्हणजे विनाशक, नाशवंत
म्हणून अरिहंत म्हणजे शत्रूंचा विनाशक होय. हे शत्रू म्हणजे लोक म्हणजे मी व तुम्ही, प्राणी, वृक्ष-झाडे इत्यादि नाहीत. आपल्यामधील अंतर्गत शत्रू त्यामध्ये काम (वासना, आवेग) , लोभ, क्रोध (राग, संताप, चीड) मद (गर्व, अहंकार, मीपणा), मोह, मत्सर, लबाडी (फसवणूक, कपट) अशा प्रकारांची आहेत. जो पर्यंत आपण आपल्या वासनांवर ताबा मिळवू शकत नाही, तो पर्यंत आपल्या आत्म्याचे सत्य स्वरूप व शक्तीचे ज्ञान समजणार नाही व व्यक्तहि होवू शकणार नाही. जो मानवी आत्मा त्याच्या शरीरातील अंतर्गत शत्रूंवर विजय मिळवितो, त्या मानवाला अरिहंत म्हणतात. ज्यावेळी असे घडते, त्यावेळी त्या मानवाचे चार घटी-कर्म संपूर्ण नाश होतात, ह्या चार घटी याप्रमाणे आहेत -
(१) ज्ञान-वर्णीय कर्म (ज्ञान अडथळा ),
(२) दर्शन-वर्णीय कर्म (आकलनशक्ती अडथळा),
(३) मोहनीय कर्म (वासना उद्भाविक) आणि
(४) अंतराय कर्म (अडथळा उद्भाविक).
ह्या कर्मांना घटी कर्म असे म्हणतात कारण हि कर्म आपल्या आत्म्याच्या सत्य स्वभावावर ताबडतोब (सरळ) परिणाम करतात.
अरिहंत दोन विभागात विभागले आहेत - (१) तीर्थांकर आणि (२) साधे तीर्थांकर - हे विशेष (खास) अरिहंत आहेत. कारण त्यांनी जैन संघाला पुनर्जीवन पुनर्शक्ती दिलेले आहेत. जैन संघामध्ये चार स्थितींचा जैन आदेश असतात जसे
प्रत्येक अर्धकाल चक्रात, आपल्यातील च्योवीस व्यक्ती हे तीर्थांकर स्थितीला पोहचतात. पहिले तीर्थांकर ऋषभदेव होते आणि शेवटले च्योविस्सावे तीर्थांकर भगवान महावीर होते. भगवान महावीर चा जीवन काल ५९९ B.C.पासून 527 B.C. पर्यंत होता. तीर्थंकरांना जीन असेही म्हणतात. जीन म्हणजे वासनांवर विजय प्राप्त करणारा. अरिहंत हे जगातील अस्तित्व संपतांना म्हणजे निर्वाण समयी आपले उरलेले चार अघटी कर्म जगात शिल्लक ठेवतात. ही चार अघटी कर्म खालील प्रमाणे आहेत -
ही चार अघटी कर्म आत्म्याच्या सत्य स्वरूपावर काहीहि परिणाम करीत नाहीत. ह्या अरिहंतांना मुक्ती (मोक्ष) मिळाल्या नंतर सिद्ध असे म्हणतात.
सिद्ध हे मुक्ती मिळालेले आत्मा आहेत. ते आपल्या पैकी नाहीत कारण त्यांचे जन्म मृत्यू चे चक्र संपूर्णपणे संपलेले आहे. ते अंतिम उच्च मुलभूत स्थितीला (मोक्ष) पोहचलेले आहेत. आता त्यांना कोणतेही कर्म नाहीत, व ते कोणतेही नवीन कर्म जमा करीत नाहीत. ह्या खऱ्या स्वातंत्र (मुक्त) स्थितीला मोक्ष असे म्हणतात. सिद्ध पुरुष अडथळ्या शिवाय असलेला अनादि (श्वाश्वत) अखंड आनंद उपभोगतात. त्यांना संपूर्ण ज्ञान, आकलन व अमर्याद शक्ती असते. ते आकार-रहित तसेच वासना-रहित असल्यामुळे ते सर्व मोहांपासून मुक्त आहेत.
आचार्यांचे कार्य म्हणजे जीन, भगवान महावीर, व शेवटले तीर्थांकर ह्यांच्या संदेशांचा प्रसार करणे असे होय. ते अध्यात्मिक गुरु असून त्यांची जिम्मेदारी अध्यात्मिक कल्याण (सुस्थिती) आहे, परंतु संपूर्ण जैन संघाची सामाजिक किंवा आर्थिक कल्याणाची जिम्मेदारी आचार्यांच्या खांद्यावर नाही. आचार्य स्थितीला पोहोचण्या आधी व्यक्तीला जैन धर्माचा सखोल अभ्यास, जैन धर्म-ग्रंथावर (अगम) नैपुण्य, आणि उच्च दर्ज्यांची आध्यात्मिक श्रेष्ठता प्राप्ती, आणि साधू (भिख्खू) व साध्वी ह्यांचा पुढाकार करण्याची पात्रता ही सर्व अभ्यासावी लागतात. आचार्यांना पुष्कळश्या इतर भाषांचे, इतर तत्वशास्त्रांचे, इतर धर्मांचे आणि जगाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
जैन धर्म-ग्रंथावर (अगम) आणि तत्व ज्ञानावर नैपुण्य मिळविलेल्या साधूंना ही उपाध्याय म्हणून उपाधी (पदवी) प्राप्त होते. साधू व साध्वींना जैन धर्म-ग्रंथांची शिकवण व ज्ञान हे उपाध्याय शिकवितात.
ज्या पुरुष आणि स्त्री यांनी जीवनातील सांसारिक पैलू अथवा सांसारिक कर्मांचा पूर्णपणे त्याग केलेला आहे, व त्यांच्या मनात आध्यात्मिक उद्धाराची तीव्र इच्छा आहे,व त्यांनी जैन धर्माची दीक्षा स्वीकारली आहे, अशा पुरुषांना साधू आणि स्त्रियांना साध्वी म्हणतात.
यांनी दीक्षेच्या वेळी, खालील पांच व्रतांचा स्वीकार केलेला असतो .
१). सव्वाव पानैवयाव विर्मन व्रत - अहिंसाचे पालन
२). सव्वाव मुसवयाव विर्मन व्रत - खरेपणा व सत्याचे पालन
३). सव्वाव आदिन्नादनाव विर्मन व्रत - अस्तेय म्हणजे चोरी न करण्याचे पालन
४). सव्वाव मेहूनाव विर्मन व्रत - ब्रह्मचार्याचे पालन
५). सव्वाव परिग्रहो विर्मन व्रत - अपरीग्रहाचे पालन - जास्तीचा धन किंवा वस्तूंचा साठा न करणे. दररोजचे जीवन जगण्यासाठी पुरेसी मिळकत कमाई करणे.
बिस्म इल्लाह इर -- रहमान इर – रहीम "بسم الله الرحمن الرحیم" (बिस्मिल्लाहिर - रहमानिर - रहीम) हे इस्लामिक प्रारंभिक मंत्रवाक्य अब्जाद (Abjad) संख्या वापरून तयार झाले आहे. यातील प्रत्येक अरबी शब्दाला संख्यारुपात मूल्य (महत्व) खालील प्रमाणे आहे.
२ + ६० + ४० + १ + ३० + ३० + ५ + १ + ३० + २०० + ८ + ४० + ५० + १ + ३० + २०० + ८ + १० + ४० = ७८६
या अरबी वाक्याचा मराठी अर्थ "अल्लाह च्या नावे, जो अत्यंत दयाळू आणि क्षमाशील आहे" असा होतो.l
कुराणातील प्रत्येक अध्याय (सौराह)surah, (फक्त सौराह क्रमांक ९ - तव्बाह सोडून) यांची सुरवात या मंत्र-वाक्याने होते.
७८६ तील अंकांचे इस्लामिक महत्व
७८६ तील अंक = ७, ८ आणि ६
इस्लामिक धर्मानुसार स्वर्गामध्ये अल्लाचे पवित्र सिंहासन हे ८ महात्मे (देवदूत) वाहतात.
खालील ६ नियमांवर श्रद्धा (विश्वास) असावी :-
जगातील सर्व संशोधक असे मान्य करितात कीं एका प्रचंड स्फोटानंतर हे संपूर्ण विश्व् अस्तित्वात आले आहे . आता प्रश्न उद्भवतो कीं हा स्फोट कसा , कां , आणि कोणी घडविला ?
आधुनिक प्रगत सायन्स नुसार असे समजते कीं या स्फोटापूर्वी, सर्व भौतिक शक्ती हे त्यांच्या मुक्त स्थितीत उपलब्ध होते. नंतर त्यांच्या अति जास्तीच्या निर्मिती मुळे ते सर्व संयुक्त स्थितीत एकत्र होऊन त्यांनी एक संग्रहित शक्तीगृह
बनविले. नंतर जास्तीच्या निर्मित शक्ती ह्या शक्तीगृहांत जमा झाल्यामुळे या शक्तीग्रहाचा प्रचंड स्फोट घडला. याच स्फोटाला बिग-बॅन्ग म्हणतात या स्फोटामुळे अधिक क्षमतेच्या ऊर्जाशील (ओजस्वी) शक्ती शक्तीगृहाच्या बाहेर फेकल्या गेल्यात .
संशोधकांना माहित आहे कीं भौतिक शक्ती या वेगवेगळ्या रूपात दुसऱ्या वस्तू किंवा क्रिया यावर कार्य करित असतात आणि हे सर्व कार्य एकमेकात रूपांतरित होऊ शकतात. काही शक्ती खालील रूपात आहेत – कायनेटिक एनर्जी, पोटेन्शीयल एनर्जी, ग्रेव्हीटेंशनल पोटेन्शीयल एनर्जी, इलेस्टीक पोटेन्शीयल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शीयल एनर्जी, ग्रेव्हीटेंशनल पोटेन्शीयल एनर्जी, इलेस्टीक पोटेन्शीयल एनर्जी, सरफेस एनर्जी, थर्मल किंवा हिट एनर्जी, केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेकट्रोस्टॅटीक एनर्जी, इलेकट्रोकेमिकॅल एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, (लाईट (प्रकाश एनर्जी), साऊंड (ध्वनी) एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, नुक्लिअर एनर्जी, इत्यादि. सूर्य हे नुक्लिअर रिऍक्टर्स आहे आणि पृथ्वीच्या आतील भागात सर्व नुक्लिअर क्रिया होतात त्या सर्व पृथ्वीच्या शक्तींना निर्माण करतात, म्हणजे अणूंमधील परमाणूच्या रचनेमध्ये होणारे रूपांतर घडवितात.
Kinetic Energy, Potential Energy, Gravitational potential energy, Elastic potential energy, Surface energy, Thermal, or heat energy, Chemical Energy, Electrical Energy, Electrostatic energy, Electrochemical Energy, Magnetic energy, Electromagnetic Energy (Light Energy), Sound Energy, Nuclear Energy (The Sun, nuclear reactors, and the interior of the Earth, all have "nuclear reactions" as the source of their energy, that is, reactions that involve changes in the structure of the nuclei of atoms), Mechanical energy, etc.1,2
1. Forms of Energy-(www.nmsea.org/Curriculum/Primer/forms_of_energy.htm)
2. Forms of energy - Wikipedia, the free encyclopedia https://en.wikipedia.org/wiki/Forms_of_energy
या सर्व भौतिक शक्तींपैकी , आपण आपल्या क्षमते नुसार , फक्त दोन शक्तींना ओळखुं शकतो.
पहिली ध्वनी शक्ती कीं जी कान -इंद्रियांद्वारे ऐकतां (audio) येते , आणि दुसरी प्रकाश शक्ती कीं जी डोळे -इंद्रियांद्वारे पाहतां (visual) येते . म्हणून हिंदू धर्मात घुमणारे आवाज तरंग (echo) यांना खालिल प्रमाणे संबोधतात - ओssssssम (Oooooooom), औम (Aum), किंवा ओम (Om) , आणि ॐ या प्रतिकात्मक रूपात दर्शवितात. दुसरे म्हणजे प्रकाशाला भौतिक किंवा नैसर्गिक रूपाचा निर्माता समझतात, म्हणून सुरवातीला स्फोटाच्या वेळी निर्माण झालेल्या शक्तियुक्त भव्य प्रकाशाच्या तेजाला देव , परमेश्वर , परब्रह्म , किंवा परमात्मा म्हणतात.
या सर्व शक्त एकमेकांशी कार्यान्वित होऊन पांच भौतिक तत्त्वें निर्माण करतात . या तत्वांना एकत्रितपणे “पंच-महाभूत” म्हणतात. हि पांच तत्त्वें खालील प्रमाणे - (1) आकाश , अंतरिक्ष, हवेचा प्रदेश (Ether or Sky - याने रिकामी मोकळी जागा (पोकळी) भरतात आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग वाढविण्यास साहाय्य करतात ), (2) पृथ्वी , माती (Earth), (3) पाणी , जल (Water), (4) अग्नी (Fire), and (5) वायू , हवा , वारा (Wind or Air). हि पांच तत्वे निसर्गाच्या विविध निर्मिती आणि कार्य तसेच संपूर्ण मानव शरिर यांच्या निर्मिती आणि कार्य करिता भाग घेतात.
हिंदू खगोलशास्त्राच्या ज्ञानाप्रमाणे, सूर्याचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पटीने जास्त आहे. आणि सूर्य व चंद्र या मधील अंतर हे सूर्याच्या व्यासाच्या १०८ पटीने जास्त आहे. ग्रहांचा आकार आणि ग्रहांमधील अंतर ह्या दोन्ही वायूंचे वातावरण आणि उष्णतामान आपल्या पृथ्वीवर जीवन वाढविण्यास पोषक आहेत. त्याच प्रमाणे, पृथ्वी आणि चंद्र यांतील अंतर हे चंद्राच्या व्यासाच्या १०८ पटीने आहे. हे पृथ्वी आणि चंद्र यांतील अंतर हे समुद्राच्या लाटा व समुद्राच्या पाण्याची हालचाल ह्या निर्माण करण्यास पोषक आहेत. दिलेले ग्रहांचे आकार व अंतर हे आधुनिक मोज-माप मशिनी यंत्राने साधारणपणे सिद्ध झाले आहेत .
अशा प्रकारची सीमा किंवा मर्यादा आणि नियम फक्त जीवन अस्तित्व असलेल्या पृथ्वीवर आणि मूलभूत निर्माण स्थानी अस्तित्वात आहेत. म्हणजे आपले जीवन हे काही निश्चित खात्रीदायक, अदभुत आश्चर्यकारक, गणितीय नियमांवर आधारित आहे आणि आपली सर्व कार्य हे त्या निर्मात्याच्या आदेश (सूचना) आणि आदेश (निकाल) या प्रमाणे आहेत .
हा निर्माता जो आपले जीवन ठरवितो , त्याला निश्चितच भव्य शक्तीचा देव किंवा परमात्मा सम्बोधावे. आणि जसे आपण इथे आहोत , तसेच देव सुद्धा इथेच अस्तित्वात आहे . तो परमात्मा आपल्या सर्वांच्या वर आहे , आणि त्याची अति-सूक्ष्म सक्रिय (कार्यक्षम) छायाप्रतीक (photocopied) स्वरूप म्हणजे आत्मा होय. हा आत्मा आपल्या दोन्ही भुवई मध्ये त्रिपुटीत अस्तित्वात असतो, आणि गहन सखोल ध्यानानंतर कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर आणि तसेच इडा आणि पिंगला नाडीचे मिलन मुख्य सुषुम्ना नाडीसोबत झाल्यावर प्रकाश रूपात त्रिपुटीत दिसतो .
In our body what is the place for atma, where it resides ...
https://in.answers.yahoo.com/question/index?qid=20100430013732AAZXvxTScientists agree that this universe has come into the existence after the enormous explosion. Now the question arises how, why and who has done this explosion ?. It may state that before this explosion all physical energies may be present in their free forms, and their collection together may form a power-house and latter due to addition of extra energies in such power-house may have resulted in the explosion called as Big-bang to throw highly charged energies, outside the power-house.
Scientists know that there are different forms of energies to do work on another object or system and these are inter-convertible. Some forms of energies are Kinetic Energy, Potential Energy, Gravitational potential energy,
Elastic potential energy, Surface energy, Thermal, or heat energy, Chemical Energy, Electrical Energy, Electrostatic energy, Electrochemical Energy, Magnetic energy, Electromagnetic Energy (Light Energy), Sound Energy, Nuclear Energy (The Sun, nuclear reactors, and the interior of the Earth, all have "nuclear reactions" as the source of their energy, that is, reactions that involve changes in the structure of the nuclei of atoms), Mechanical energy, etc.1,2.
Out of these, so far, we only realize as per our capacity only about ‘Sound’ enengy which can be listened (audio) and about ‘Light’ energy which can be seen (visual). Therefore, in Hinduism, the sound resonance (echo) is referred to as Oooooooom, Aum, or Om and designated in symbolic form as ॐ. Secondly the light is referred to as the physical form or shape of the creator observed in the beginning as a luster and this visual radiance is referred to as God, Parmeshwar, Parabrahma, or Paramaatma having super powers.
All these energies or powers interact to work and produce five physical elements collectively called as ‘Panch-Mahabhoot’. These are (1) Ether or Sky (to fill all space and to support the propagation of electromagnetic waves), (2) Earth, (3) Water, (4) Fire, and (5) Wind or Air. These five elements are responsible for creation and functions of various organs of the nature including human body.
According to Hindu Astrological knowledge, the Diameter of sun is about 108 times that of the diameter of earth, and the distance between sun and moon is about 108 times that of the diameter of sun. The size of planets and distance between planets is perfect to maintain the gaseous atmosphere and the temperature to develope the life on our earth. Similarally, the distance between eatth and moon is about 108 times that of the diameter of moon. This earth-moon distance is perfect to create tides in sea-water for movements. The given size and distance of planets is now approximately proved correct as per modern measurement instruments.
Such types of limits and regulation may be existing between life possessing earth and basic creative place , that means our life is governed under certain miraculous mathematical rules and regulations, and all our functions are as per the instruction and decision of that creator. This creator as deciding our life, must be designated as God or Paramaatma with its super powers. And as we are here, God also exist there. That Paramaatma is present above all and its smallest active photocopied form called Aatma is present at triputi between two eyebrows in human being, which can be experienced as Light after the union of Ida and Pingala Nadis with main Sushumna Nadi and the activation of Kundalini Shakti, possible through deep meditation and Yog processes.
आत्मा , देव किंवा परमात्मा ह्यांना जाणण्यासाठी योग - पद्धतीचे ज्ञान आवश्यक आहे . पातांजली तांत्रिक योग पद्धती नुसार , आपल्या शरीरात खालील प्रमाणे एकंदर सात यौगिक चक्रें आहेत –
आज्ञा चक्र हे सहावे योगिक चक्र दोन भुवयांच्या मध्ये दोन पाकळ्यांचे निळ्या रंगाचे कमळ रूपांत असते . योग -साधकाच्या ध्यानातील प्रगती नुसार कुंडलिनी शक्ती जागृती झाल्या नंतर या चक्राच्या स्थानी इडा आणि पिंगळा नाडींचे सुषुम्ना नाडी सोबत मिलन होते. या मिलनामुळे द्वैत भाव (duality) विचार थांबतात आणि शेवटी जीव (Soul) जागृती होऊन यामुळे अंतस्थ खरी चेतना (inner real conciosness) किंवा चैतन्य जागृत होते. हा जीव (Soul) हाच ॐ रूपातील आत्मा आहे. दोन भुवयांच्या मधील ओम चे आज्ञा चक्रावरील ह्या स्थानाला भ्रिकुटी असे संबोधतात. आज्ञा चक्र आणि भ्रिकुटी (दोन भुवया) ह्यांच्या संयोगाला त्रिपुटी असे संबोधतात. म्हणून, आपल्या शरीरात , आपल्या कपाळावर जीव किंवा आत्म्याचे स्थान त्रिपुटी आहे. या आत्म्याची पूजा करण्यासाठी, हिंदू लोग आपल्या कपाळावर तिलक (गंध , कुंकू) लावतात . [ दोन भुवयांच्या मधील या केंद्रीय त्रिपुटी वर तिलक लावल्याने मनोविज्ञान शास्त्रानुसार आपल्या आत्मविश्वासात बढोत्तरी होते, तसेच अनावश्यक उद्भवणाऱ्या मानसिक उत्तेजनांवर पुष्कळ प्रमाणात नियंत्रण मिळते, आणि आयुर्विज्ञान शास्त्रानुसार तिलक (गंध, कुंकू) लावल्याने मेंदूमध्ये सेरोटोनिन या न्यूरोट्रान्समीटरचे स्रवण नियंत्रित प्रमाणात होते, ह्यामुळे मनांत सकारात्मक विचार प्रवाह विकसित होतात, या नवचैतन्यमयी उत्साव-वर्धनामुळे उदासीनता दूर होते, व नकारात्मक विचार प्रवाह कमी होऊन तणाव व डोकेदुखी इत्यादि मानसिक विकार पुष्कळश्या प्रमाणांत कमी होतात.] आज्ञा चक्राचे कार्य हे मेंदूच्या मध्यात असलेल्या दोन्ही गोलार्ध (Hemispheres) anthich मधील खाचेत (groove) असलेल्या पिनियल ग्लॅन्ड (Pineal gland) या संप्रेरक ग्रंथीशी (Endocrine gland) संबंधित आहे. पिनियल ग्लॅन्ड हि प्रकाश संवेदनशील आणि प्रकाशाने सक्रिय (जागृत) होणारी आहे. हि ग्रंथी मुख्यतः मेलॅटोनीन (Melatonin , N-acetyl-5-methoxy-tryptamine) हे संप्रेरक (hor mone) स्त्रवते. . मेलॅटोनीन हे अंतरात्म्याला होणारे प्रबोधन, ज्ञान, विचार, शक्ती, अचूक निर्णय शक्ती, वगैरें वरती भावनात्मक रूपाने नियंत्रण करते तसेच झोपणे व निद्रा घेणे यांच्या क्रियांवर शारीरिक रूपाने नियंत्रण करते, आणि तसेच सर्व संप्रेरक ग्रंथींचे नियंत्रण करते. (Melatonin controls emotionally the enlightenment of inner self, inner knowledge, inner thoughts, inner powers, correct decision power etc, and physiologically the process of waking up and sleeping and controls all endocrinal functions.) पिनियल ग्लॅन्ड त्याच प्रमाणे Di-methyl-tryptamine नावाचे केमिकल स्त्रवते. हे केमिकल नाशिली औषधी व दारू प्रमाणे आपल्या शरीरात अशक्य, काल्पनिक विचार, बुद्धीभ्रंश, सुस्ती, भ्रम निर्माण करतात. पुष्कळसे हिंदू साधू त्यांच्या अति तीव्र ध्यान आणि भक्ती मुळे आपल्याला भ्रमिष्ट अवस्थेत स्वतःशी बडबड करीत किंवा देवांशी बोलतांना आणि बाह्य भौतिक जगाला विसरल्या सारखे आढळतात.
In our body what is the place for atma, where it resides ...
Answer :
According to Patanjali Tantrik Yog System, there are total seven Body Chakras, which is a pathway to realize God (Paramaatma) . They are as follows :-
Agya chakra is the sixth Yogik Chakra located between two eye-brows in the form of blue colored lotus having two petals. This chakra is the place of union of Ida and Pingla nadis with Sushumna nadi, with the help of Kundalini shakti, as per meditation progress of Yogi. This union stops the thought of duality and finally activates the Soul to bring the inner real conciosness or Chaitanya. This Soul is the Atma located as ॐ (Om). This place of Om over Agya chakra is located between two eyebrows, refered to as Bhrikuti. The word Triputi is derived by the union of Bhrikuti (two eyeboows) with one Agya chakra, therefore Triputi is the place of the Soul or Atma on the forehead in our body.
To worship this Soul, the hindus put tilak on their forehead.
The working of Agya chakra is related to Pineal gland which is a Endocrine gland situated in a groove of two Hemispheres in the central part of brain. Pineal gland is light-sensitive and activated by light. This gland secretes mainly Melatonin hormone (N-acetyl-5-methoxy-tryptamine) that controls emotionally the enlightenment of inner self, inner knowledge, inner thoughts, inner powers, correct decision power etc, and physiologically the process of waking up and sleeping and controls all endocrinal functions. Pineal gland additionally secrets Di-methyl-tryptamine named chemical creating illusory ideas or imaginations of unrealized matter , happening similarly with narcotic drugs or wine. Most of Indian Sadhus because of their deep meditation and devotion are observed with such illusions in the state of self-murmuring or talking with God and forgetting the outer bhoutik world.
- Dr. Shreeram Kakde, 4/101 - Vaishnavi Apartments, Gajanan Nagar, Nagpur, 440027 (Maharashtra), India
15th Sept. 2015 (shreeramkakde@yahoo.com)
shreeramkakde@yahoo.com - Password narayan - Code 7479
मी कोण आहे ? याचे उत्तर सामान्य आणि नास्तिक व्यक्तींसाठी अशक्य आहे, कारण ते या संसार-बंधनात, घमेंडी (अहंपणा) स्वभावात, आणि तसेच तृप्त सुखी जीवनांत स्वतःला विसरलेले असतात, त्यामुळे ते आपले सत्य स्वरूप समजूं शकत नाही.
अशा भौतिक सुखाधीन व्यक्तींसाठी, ते स्वतः म्हणजे त्यांचे नांव, उदाहरणार्थ राजेश. जर त्यांना कोणी विचारले किं तुम्ही कोण ?, तर ते राजेश असेच सांगतात. परंतु ते असत्य आहे, कारण राजेश हे नांव त्यांच्या शरिराचे आहे. म्हणजेच आपण म्हणजे आपले नांव व आपले शरीर या दोन्हीं भिन्न आहेत. तर आपण स्वतः कोण ? हा प्रश्न आपल्या साठी निरुत्तर ठरतो.
मी कोण आहे ? या प्रश्नाचे खरे आकलन कांहीं धार्मिक पुस्तकाव्दारे व तसेच धर्मात्मांच्या प्रवचनाव्दारे होऊ शकते. त्यासाठी सर्वात प्रथम अहंपणा हा दुर्गुण त्यागून ईश्वर आणि गुरु वर पूर्ण विश्वास ठेवून शरण-वृत्ती व धार्मिक प्रवृत्ती अवलंबन करणे आवश्यक आहे, तरच सत्य ज्ञान संपादन होऊ शकते. आत्मा, परमात्मा व ईश्वर यांचे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर, ध्यान-धारणा इत्यादि योग-साधने मुळे एकाग्रता प्राप्त होऊन, देह-जाणीव व कर्म-बंधन यातून मुक्ती मिळून, आपोआप सत्याचे दर्शन व ज्ञान प्राप्त होते.
याव्दारे आपण स्वतः कोण ?, आपले सत्य स्वरूप काय ?, जीवनाचे ध्येय कोणते ? याचे आपल्याला आकलन होते. आपण आध्यात्मिक आत्मज्ञान खालील पांच भागांत विभागून अभ्यास करू.
आध्यात्मिक शास्त्रानुसार जीवित शरीर हे सहा देहांचे बनलेले आहे, ते स्थूल देह, प्राण देह, मनो देह, कारण देह, महाकारण देह आणि आत्मा असे आहेत.
स्थूल देह म्हणजे आपली पूर्ण शारीरिक इंद्रिये. आपल्या इंद्रियांची निर्मिती आणि कार्य हे आकाश, भूमी, पाणी, अग्नी, व वायु या पंच-महाभूतां पासून होते. आपले शरीर हे खालील सतरा १७ घटकांचे बनलेले आहे, यात ५ ज्ञानेंद्रिय, ५ कर्मेंद्रिय, ५ प्राण (वायु), १ बुद्धी आणि १ मन असे घटक असतात.
प्राण देह हे स्थूल देह व मनो देह या दोन्ही देहांच्या क्रिया-कार्यासाठी लागणारी मुख्य चालनादायी शक्ति आहे. या जीवनावश्यक शक्तिला प्राण म्हणतात. हा प्राण-वायु पासून निर्मित होतो.
प्राण-वायु पासून निर्मित होणारे प्राण, अपान, समान, उधान आणि व्यान या सर्व एकंदर पांच वायूंच्या संग्रहाला पंच-वायु म्हणतात. या पांच वायूंचे शरीरातील स्थान व कार्य अलग-अलग आहेत.
मनो देह हा शरीरातील मेंदू व्दारे कार्य करतो. मनो देह ही आपल्या मनात येणारे भावना, संवेदना, उत्तेजना व ईच्छा यांच्या निर्मांण कार्यासाठी मनातील आसन आहे.
कारण देह हा देखील शरीरातील मेंदू व्दारे कार्य करतो. कारण देह हा निर्णय किंवा तर्क करणे आणि उपाय व कारण शोधणे यांची क्षमता आहे.
महाकारण देह हा वास्तविकता बाबत अज्ञानता आणि ईश्वरापासून भिन्नता (नास्तिकता) दर्शवितो. या देहाचे चार विभाग आहेत. मन, बुद्धी, स्मरण किंवा चित्त आणि अहंकार हे चारही विभाग शारीरिक-बुद्धीला आकलन होणारे जाणीवां पैकी आहेत.
आत्मा हा महाकारण देहाच्या विविध भागांच्या पलिकडे अलग आनंदमय कोषामधें राहतो व हा परम ईश्वरीय तत्वाचा अंश आहे. आपल्या शरीरा सभोवती अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय ही पंच-कोष (आवरण) असतात. त्यातील सर्वांत आंतील आनंदमय कोष हा
पातांजली तंत्र योगानुसार, मनुष्य शरीरांत मुख्य योगिक चक्र एकंदर सांत आहेत.
ही चक्रे आपल्या लिंग-शरीरात असून ती डोळ्यांनी दिसत नाहीत. या चक्रांची जाणीव फक्त मनकेंद्रीकरण व ध्यान प्रक्रियेने होऊ शकते. मनुष्याच्या पाठीचा मणका (पृष्ठकणा) यांत इडा, पिंगला, आणि सुषुम्ना या तीन योगिक नाडी आहेत, या नाडी द्वारे जीवनावश्यक असलेली प्राण शक्ती वर वर सरकते. या तीन पैकी, सुषुम्ना नाडी ही वरिल योगिक चक्रांशी जोडलेली आहे.
पहिले मूलाधार चक्र हे सर्वांत खालील आधार चक्र आहे, हे ४ लाल रंगाच्या पाकळ्या असलेल्या कमळाने संबोधितात. हे चक्र पाठीच्या माकडहाडाच्या कणाच्या खालील जागी असते. या मूलाधार चक्रात कुंडलिनी ही योगिक शक्ती असून ती काळ्या स्वयंभू लिंगा सभोवती सुप्त (निद्रीस्त) अवस्थेत साडे-तीन गुंडाळी मारलेल्या स्वरुपात असते. या मूलाधार चक्रात इडा, पीडा, व सुषुम्ना ह्या तीन मुख्य नाडी अलग-अलग असून त्यांचा ऊर्ध्वगामी (वरच्या बाजूला) सरकण्याचा प्रारंभ इथून होतो.
दुसरे स्वाधिष्ठान चक्र हे जननेन्द्रिया जवळ असून हे पांढऱ्या रंगाची चंद्रकोर आंत असलेल्या ६ शेंदरी किंवा केशरी पाकळ्या असलेल्या कमळाने संबोधतात.
तिसरे मणिपूर चक्र हे बेंबी जवळ असून हे अधोगामी दर्शविणारे त्रिकोण हे पिवळ्या रंगाच्या १० पाकळ्या असलेल्या कमळा समान असते.
चवथे अनाहत चक्र हे हृदयात आहे म्हणून याला हृदय चक्र असेही म्हणतात. हे चक्र हिरव्या रंगाच्या १२ पाकळ्यांचे वर्तृळाकार कमळ असे संबोधतात. ह्या चक्रात दोन त्रिकोण छेदून बनलेले षटकोनी यंत्र आहे, हे यंत्र पुरुष शक्ती आणि स्त्री शक्ती यांचे मिलन दर्शविते.
पाचवे विशुद्ध चक्र हे कंठा मध्ये आहे, म्हणून याला कंठ चक्र असेही त्याच्या स्थानानुसार म्हणतात. हे पांढऱ्या वर्तुळात रुपेरी चंद्रकोर असून तिच्या भोवती फिक्कट निळा रंगाच्या १६ पाकळ्या असे चित्रित करतात.
सहावे आज्ञा चक्राला तीसरा नेत्र चक्र असे म्हणतात. हे दोन्ही भुवयांच्या मध्ये असून हे चक्र जांभळा किंवा निळा रंगाचे दोन पाकळ्यांचे कमळ रुपात असते. ह्या ठिकाणी आजूबाजूच्या दोन इड़ा आणि पिंगळा नाड्या संपून त्या दोन्ही मध्य नाड़ी सुषुम्ना मधे मिसळून जातात. त्यामुळे द्वैतपणा म्हणजे दोन प्रकारचे विचार (जसे हा आणि तो, पुरुष आणि स्त्री, चांगले आणि वाईट, पाप आणि पुण्य, उजेड आणि अंधार) हे संपतात. शेवटी जीव जागृती होऊन यामुळे अंतस्थ खरी चेतना किंवा चैतन्य जागृत होते. हा जीव हाच ॐ रूपातील आत्मा ध्यान-योग-साधनेव्दारे प्रकाश रूपात त्रिपुटीत दिसतो.
दोन भुवयांच्या मधील ओम चे आज्ञा चक्रावरील ह्या स्थानाला भ्रिकुटी असे संबोधतात. आज्ञा चक्र आणि भ्रिकुटी (दोन भुवया) ह्यांच्या संयोगाला त्रिपुटी असे संबोधतात. या आत्म्याची पूजा करण्यासाठी, हिंदू लोग दोन भुवयांच्या मधील या केंद्रीय त्रिपुटी वर म्हणजेच कपाळावर तिलक (गंध , कुंकू) लावतात. असे तिलक लावल्याने मनोविज्ञान शास्त्रानुसार आपल्या आत्मविश्वासात बढोत्तरी होते, तसेच अनावश्यक उद्भवणाऱ्या मानसिक उत्तेजनांवर पुष्कळ प्रमाणात नियंत्रण मिळते.
योगाभ्यासाच्या प्रगतीनुसार जागृत झालेली कुंडलिनी मूलाधार चक्रातून वर वर सहा चक्रातून सरकत डोक्याच्या उच्च कळसावर असलेल्या सातव्या सहस्त्रार चक्रात पोहचते, हे अनेक-रंगी सहस्त्र दल कमळ स्वरूपात असून या ठिकाणी कुंडलिनी शक्तीचे पुरुष शिव-शक्तीशी मिलन होते. या मिलनामुळे योग्याची चेतना फुलारते आणि योगीचे विलीनीकरण हे दिव्य इश्वरिय चेतनेमध्ये संपन्न होते आणि समाधी अवस्था प्राप्त होते. या अवस्थे मधें शारीरिक देहभान म्हणजे चेतना असून कर्माची मुक्तता होते.
आत्मा हा एक सर्वसामान्य शब्द असून तो मूलभूत अंतिम वस्तुस्थिती दर्शवितो. आत्मा शब्दाचे वर्गिकरण हे जीवात्मा आणि परमात्मा अशा दोन प्रकारात होवू शकते.
जीवात्मा म्हणजे शरीरासह माझी व तुमची मूलभूत वस्तुस्थिती दर्शविणे म्हणजेच प्रकृती व आत्मा मिळून जीवात्मा होतो.
परमात्मा म्हणजे सर्व आत्म्यांचा एकुलता एक असणारा परम आत्मा म्हणजेच परमेश्वर (देव) किंवा ब्रम्ह असा अर्थ होतो.
आत्मा व परमात्मा ह्या दोघांना प्रतिपादन करणारे कोणतेही घटक (तत्व) नाहीत, त्यांना नाव, आकार, शरीर नाहीत, तसेच मन देखील नाहीत त्यामुळे हे विचार व विकार रहित असून अतिशय शुद्ध व पवित्र आहेत. ह्या दोघांचे व्यक्तीत्व आपल्या ज्ञान, अज्ञान व बुद्धी पलीकडील आहेत. आत्मा व परमात्मा म्हणजे सार्वभौमिक (सार्वत्रिक) दैविक तत्व असून ही दोघेही मूलभूत अंतिम सत्य आहेत.
३.१. आत्मा
आत्मा म्हणजे देवाचा प्रकाश (चैतन्य), हा आत्मा प्रत्येक जिवंत प्राण्यांत जीवनाचे चैतन्य म्हणून उपलब्ध असतो. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे म्हणून आत्मा हा परमात्म्याच्या रुपात निसर्गात उपलब्ध आहे. जसे एखाद्या झाडाचे बी मध्ये त्या झाडाचे गुणधर्म असतात, तसेच आत्मामध्ये सुद्धा परमात्म्याचे सर्व गुणधर्म असतात.
आत्मा म्हणजे स्वतःचे सत्य स्वरूप. आत्मा म्हणजे अनादि, शाश्वत, अनंत, अपरिवर्तनीय, अमर, अनामी, अरूपी, अविनाशी, सदा विद्यमान असे मुलभूत स्वतंत्र स्वरूप आहे.
३.२. जीवात्मा
जीवात्मा म्हणजे व्यक्तिगत जीव. जीवात्मा हा व्यक्तीमधील आत्म्याचे प्रतिबिंब आहे.
भगवद्गीतेमध्ये (२.२३) श्रीकृष्णाने आत्म्याबद्दल असे सांगितले कि हे पराक्रमी धनुर्धारी अर्जुना, या तुच्छ जगतातील जिवंत लोक तसे पाहिल्यास निर्जिव लोक असून त्यांच्यात माझीच श्रेष्ठ चैतन्य शक्ती आहे. या भौतिक शरीरातील जीवाला जीवात्मा म्हणतात.
३.३. परमात्मा
परमात्मा हा दैविक परम तत्व असून त्यालाच आपण देव, परम स्व-तत्व, सत्य, प्रेम, आनंद असे म्हणतो. परमात्मा म्हणजे सर्वात श्रेष्ठ परम आत्मा होय. जर शरीराचे स्व-तत्व आत्मा आहे, तर आत्माचे स्व-तत्व परमात्मा आहे, म्हणून परमात्मा हा आत्म्यांचा आत्मा आहे. म्हणजे परमात्मा रुपी आनंद-सागर सर्व जिवंत प्राणीमात्रेच्या आत्म्यामध्ये असतो.
जगातील सर्व संशोधक असे मान्य करितात कीं एका प्रचंड स्फोटानंतर हे संपूर्ण विश्व् अस्तित्वात आले आहे.
या स्फोटापूर्वी, सर्व भौतिक शक्ती हे त्यांच्या मुक्त स्थितीत उपलब्ध होते. नंतर त्यांच्या अति जास्तीच्या निर्मिती मुळे ते सर्व संयुक्त स्थितीत एकत्र होऊन त्यांनी एक संग्रहित शक्तीगृह बनविले. नंतर जास्तीच्या निर्मित शक्ती ह्या शक्तीगृहांत जमा झाल्यामुळे या शक्तीग्रहाचा प्रचंड स्फोट घडला. याच स्फोटाला बिग-बॅन्ग म्हणतात या स्फोटामुळे अधिक क्षमतेच्या ऊर्जाशील (ओजस्वी) शक्ती शक्तीगृहाच्या बाहेर फेकल्या गेल्यात.
या सर्व भौतिक शक्तींपैकी, आपण आपल्या क्षमते नुसार, फक्त दोन च शक्तींना ओळखुं शकतो. पहिली ध्वनी शक्ती कीं जी कान -इंद्रियां व्दारे ऐकतां येते, आणि दुसरी प्रकाश शक्ती कीं जी डोळे -इंद्रियां व्दारे पाहतां येते. म्हणून हिंदू धर्मात घुमणारे आवाज तरंग यांना खालिल प्रमाणे संबोधतात - ओssssssम किंवा ओम, आणि ॐ या प्रतिकात्मक रूपात दर्शवितात. दुसरे म्हणजे प्रकाशाला भौतिक किंवा नैसर्गिक रूपाचा निर्माता समझतात, म्हणून सुरवातीला स्फोटाच्या वेळी निर्माण झालेल्या शक्तियुक्त भव्य प्रकाशाच्या तेजाला देव, परमेश्वर, परब्रह्म, किंवा परमात्मा म्हणतात.
या सर्व शक्त एकमेकांशी कार्यान्वित होऊन पांच भौतिक तत्त्वें निर्माण करतात . या तत्वांना एकत्रितपणे “पंच-महाभूत” म्हणतात. हि पांच तत्वे निसर्गाच्या विविध निर्मिती आणि कार्य करिता भाग घेतात.
हिंदू खगोलशास्त्राच्या ज्ञानाप्रमाणे, ग्रहांचा आकार आणि ग्रहांमधील अंतर ह्या दोन्ही वायूंचे वातावरण आणि उष्णतामान आपल्या पृथ्वीवर जीवन वाढविण्यास पोषक आहेत. म्हणजेच आपले जीवन हे काही निश्चित खात्रीदायक गणितीय नियमांवर आधारित आहे आणि आपली सर्व कार्य हे त्या निर्मात्याच्या सूचना आणि आदेश या प्रमाणे आहेत .
हा निर्माता जो आपले जीवन ठरवितो , त्याला निश्चितच भव्य शक्तीचा देव, परमेश्वर किंवा परमात्मा सम्बोधावे. आणि जसे आपण इथे आहोत, तसेच देव सुद्धा इथेच अस्तित्वात आहे. तो परमात्मा आपल्या सर्वांच्या वर आहे, आणि त्याची अति-सूक्ष्म सक्रिय कार्यक्षम छायाप्रतीक स्वरूप म्हणजे आत्मा होय.
तत्वज्ञानानुसार माझी ओळख व अस्तित्व काय ?, मी कोण आहे ? असे प्रश्न मनात उदभवतात. मी शरीर, मन, गुण,विचार, भावना किंवा इतर काही विशिष्ट या पैकी आहे असा विचार करतांना आपल्याला आपले स्व-तत्वाचे अतिसूक्ष्म स्वरूप त्याच्या मुलभूत ज्ञानासह समोर येते आणि शेवटी आपल्याला समजते कि आपण तत्व, गुण यापैकी काहीही नसून असा अनुभव येतो कि आपल्यातच राहणारे दैविक स्व-तत्वाचे मूलतत्व असून ते शाश्वत (अनादि अनंत), अमर्यादित (विस्तीर्ण) व अविकारी (अक्षय) असून त्याचे नाव सत्चिदानंद (सत-चित-आनंद) आहे.
• सत – सत्य
• चित – चैतन्य (चेतना, जाणीव, शुद्धी, देहभान)
• आनंद – परमानंद (धन्यता, कल्याण) म्हणून मी आनंदी, तृप्त, शुद्ध, मंगल, परम अशा चिदानन्दाचे सत्य स्वरूप आहे. म्हणून अध्यात्मिक दृष्टीने माझे नांव सत्य-स्वरुपातील आत्मा आहे आणि शुभ व कल्याणकारी सद्कार्याने चैतन्यमय ईश्वर आहे, मात्र व्यहवारिक दृष्टीने माझ्या शरिराचे नांव राजेश आहे आणि संसारिक-कर्म-बंधनयुक्त सामाजिक-कार्याने मानव आहे. ‘ “मी कोण आहे ?” या प्रश्नाचे उत्तर आता आपल्याला आकलन झाले, ते म्हणजे “मी आत्मा आहे”. मी आत्मा आहे |||. shreeram kakade bhaktigit