Preloader

प्रस्तावना

संस्कृत प्रस्तावना

माता स्व. सौ. मंगला, पिता स्व. श्रीयुत नारायण: काकडे तथा विठ्ठलभक्त: मातुल: स्व. श्रीयुत गुणवन्त: सवनकर महोदय: एतानि हरिभक्तिपाठ: अयच्छन् | शालेय जीवने संस्कृतविषयस्य अध्ययनेन देवभाषासम्बन्धाय श्रद्धा अवर्धत् |. तत्पश्च्यात जीवने संतवाङमयस्य प्रभावेन ध्यानादि योगमार्गे चित्तवृत्ती: प्रवाहमान: अभवत् | १९९९ ख्रिस्ताब्दे आगष्ट मासस्य १६ तम दिनांके (श्रावणमासस्य प्रथम सोमवासरे) भावावस्ये अकस्मात: संकृतभाषे हरिस्तुतिपर स्तोत्रम् अस्फुरत् | संस्कृत भाषयाम् एकम् वचनम् अस्ति – ' श्रद्धावांल्लभते ज्ञानम् ‘ इदम् मम जीवने खलु सार्थकम् अभवत् | इति मम विश्वासम् | अद्यपर्यंतम् संस्कृत बृहद्स्तोत्रानि, लघुस्तोत्रानि, भक्तिगीतानि, संतस्य अभंगाणाम् सन्स्कृतेन भाषांतरम् एवम् मराठी भक्तिगीतानि अपि अरचयत् | समये समये स्फुरिता: रचना: विविधे वर्तमानपत्रे अप्रसिध्यन् | २००५ ख्रिस्ताब्दे महाराष्ट्र शासनस्य 'महाकवी कालिदास - संस्कृत साधना' पुरस्कारेन गौरवान्वित: अभवत् | युष्मद् नित्याप्रति उत्तम: यश: तथा उन्नति: करोतु इदम् शुभेच्छा: || शुभम् भवतु || कल्याणमस्तु ||

मराठी प्रस्तावना

हरी-भक्तीचा वारसा माझी आई स्व. सौ मंगला , माझे वडील स्व. श्री नारायण रामचन्द्र काकडे आणि माझे मामा विट्ठल भक्त स्व. संत श्री गुणवंत कृष्णराव सवनकर (मु. कुर्ली, जिल्हा यवतमाळ) यांच्या कृपाशिर्वादाने मिळाला. १६ आगस्ट १९९९ (त्या वर्षातील प्रथम श्रावण सोमवार) रोजी हरी- प्रेम भावभक्तिची उत्कट भावना एकाएकी उफाळून आली आणि त्या आनंदात संस्कुत व मराठीतून हरीस्तुतीपर प्रार्थना, स्तोत्र व गीत उत्स्फुर्तपणे प्रगट होऊ लागलीत.वेळोवेळी प्रगटलेल्या संस्कृत व मराठी स्तोत्र व गीतांचे संकलन केले आहेत. अनेक मंदिरात, धार्मिक शिबिरांत आणि संबंधितांना वाटप केलेत. त्याचप्रमाणे मान्यवर वृत्त-पत्रांतहि त्यांचे प्रकाशन केलेले आहेत. या संस्कुत सेवेबद्दल, महाराष्ट्र शासनाने नारळी (श्रावण) पोर्णिमा, शुक्रवार दिनांक १९ आगस्त २००५ रोजी शासनाच्या संस्कृत दिन समारोहा मधे ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराने मला गौरविले आहे. हरी गुणगाण हीच हरी-भक्तिची सोपी किल्ली आहे हे लक्षात ठेवून या भक्तिभाव-सुमनांचा आनंद सर्वांना मिळण्या साठी आणि आपण सर्वांना सदैव हरी सोबत ठेवून आपले जीवन कल्याणमय होईल या सद्- भावनेसह सादर करित आहे. || हरि ॐ ||

अभिप्राय

मी सौ. साक्षी राजीव देशपांडे , व्यावसायिक गायिका व संगीतकार आहे. डॉ. श्री. श्रीरामनारायण काकडे , यांच्या शब्द रचनांचा मी सध्या संगीतबद्ध करण्याकरिता अभ्यास करते आहे. ह्या कवीराजांच्या सर्व रचना वृत्तबद्ध आहेत.मराठी, हिंदी तर आहेतच पण संस्कृत रचना देखील नादमय आहेत. त्यामुळे या रचना स्वरबद्ध करण्यास अवघड जात नाहीत. कवीवर्याच्या ह्या सर्व रचना भक्तीरसाने ओथंबलेल्या आहेत.अतिशय भावपूर्ण अशा रीतीने सर्व देवतांचे सुंदर असे वर्णन त्यांनी केले आहे. मला वैयक्तिक आवडलेली रचना म्हणजे, "गोकुळीचा बाळ, गोजीरा गोपाळ", तसेच संत श्री गजानन महाराजांवरची संस्कृत मधील रचना आहे. सगळ्याच रचना अत्यंत छान झाल्या आहेत. परमेश्वराचा हा त्यांना कृपाप्रसाद आहे असे मला वाटते. हा भावसुगंध असाच कायम दरवळत राहो. ह्या रचना संगीतबद्ध करून सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या आणि या भाव यज्ञात माझ्या कडून स्वरभाव-समिधा अर्पण व्हाव्या हीच सद्गुरुंच्या चरणी प्रार्थना.

लेखक


डॉ. श्रीरामनारायण काकडे


शिक्षण - एम.एससी. (जीवरसायनशास्त्र) , पीएच. डी., डी. एच. बी., डी आय आर पी एम.
‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार, महाराष्ट्र शासन, आगस्त २००५.
कार्य - वैद्यकिय महाविद्यालये प्राध्यापक व जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख , bhaktisarita

महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार

Team Member
महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार

१६ आगस्ट १९९९ (त्या वर्षातील प्रथम श्रावण सोमवार) रोजी हरी- प्रेम भावभक्तिची उत्कट भावना एकाएकी उफाळून आली आणि त्या आनंदात संस्कुत व मराठीतून हरीस्तुतीपर प्रार्थना, स्तोत्र व गीत उत्स्फुर्तपणे प्रगट होऊ लागलीत. वेळोवेळी प्रगटलेल्या संस्कृत व मराठी स्तोत्र व गीतांचे संकलन केले आहेत. अनेक मंदिरात, धार्मिक शिबिरांत आणि संबंधितांना वाटप केलेत. त्याचप्रमाणे मान्यवर वृत्त-पत्रांतहि त्यांचे प्रकाशन केलेले आहेत. या संस्कुत सेवेबद्दल, महाराष्ट्र शासनाने नारळी (श्रावण) पोर्णिमा, शुक्रवार दिनांक १९ आगस्त २००५ रोजी शासनाच्या संस्कृत दिन समारोहा मधे ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराने गौरविले आहे. bhaktisarita by shreeram kakade

संग्रह

0

संस्कृत रचित स्तोत्र संग्रह

0

संस्कृत रचित भक्तिगीतानि

0

संस्कृत अनुवादित भक्तिगीतानि

0

मराठी भक्तिगीत

संपर्क

पत्ता

प्लॉट नं. ४, फ्लॅट नं. १०१, वैष्णवी अपार्टमेंट, श्रीगजानन महाराज मंदिरा शेजारी,

गजानन नगर को-ऑपरेटिव सोसायटी, गजानन नगर, रिंग रोड , नागपूर, ४४००२७, महाराष्ट्र.

Mob : +91 - 9479378004

Email : shreeramkakde@rediffmail.com